पहाटे लागलेली आग सकाळी विझली; साखर कारखान्यांचे बंब आले धावून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग्निशामक बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सकाळ पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमनचे जवळपास तीस बंब आग विझविण्यासाठी लागले. यावेळी जेसीबी च्या सहाय्याने वखारीतील इतर लाकडे आगीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला.
 

उंब्रज :  उंब्रज ते मसूर जाणारे मार्गावर शिवडे ता.कराड गावच्या हद्दीत असणार्या लाकडाच्या वखारीला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची घटना आज (शुक्रवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
याबाबत अधिक माहिती अशी, शिवडे ता.कराड गावच्या हद्दीत उंब्रजचे माजी सरपंच दत्तात्रय श्रीपती जाधव यांच्या मालकीची लाकडाची वखार आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वखारीत असणाऱ्या शेडला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत वखारीतील लाकडे व मशिनरी पूर्णतः जळून खाक झाली. या आगीची माहिती स्थानिक ग्रामस्थांना समजताच त्यांनी तातडीने सदरची माहिती दत्तात्रय जाधव यांना दिली.

घटनास्थळी स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग्निशामक बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सकाळ पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमनचे जवळपास तीस बंब आग विझविण्यासाठी लागले. यावेळी जेसीबी च्या सहाय्याने वखारीतील इतर लाकडे आगीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला.

या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १ लाख रुपयांचे लोखंडी शेड,  लाकडे फोडण्याचे एक मशिन, कटर मशिन दोन,  कॉंप्रेसर एक असा सुमारे सहा लाख रुपये किंमतीचा ऐवज तसेच ३ लाख रुपये किंमतीची जळाऊ लाकडे असा सुमारे १० लाख रुपये किंमतीचा ऐवज जळून खाक झाला आहे. आग विझविण्यासाठी कराड नगरपालिकेचे दोन, सह्याद्री कारखान्याचा एक आणि जयवंत शुगर कारखान्याचा एक असे चार आग्निशामक बंब घटनास्थळी आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते.

#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire On Umbraj Masur Road