प्रशासनाला याचे गांभीर्य अजिबात नसल्याचे उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल. नुसत्या निसर्गप्रेमींनी पुढाकार घेऊन उपयोग नाही, तर यामध्ये प्रशासनानेही आपली जबाबदारी नीट पार पाडणे महत्त्वाचे आहे.
‘‘एक झाड वर्षाला ७५ हजार रुपयांची पर्यावरणाला मदत करत असते. ते झाड शंभर वर्षे जगले, तर ७५ लाख रुपयांची मदत करते’’, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोंदवले आहे. सध्या अनेक ठिकाणी लागणाऱ्या वणव्यात गवताबरोबरच अशी असंख्य झाडेही जळून खाक होत आहेत. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी जवळपास १२३ ठिकाणी जंगली भागात वणवे लागले.