मिरजमध्ये मोकळ्या चारचाकीवर गोळीबारः दोन फैरी झाडल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

मिरज - येथील जवाहर चौकात शिवराज कॉम्प्लेक्स या इमारतीसमोर लावलेल्या खासगी मोटारीवर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. पण भर चौकातील रहदारीच्या रस्त्यावर खासगी मोटारीवर झालेल्या या गोळीबारामुळे या परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

येथील इंडीयन ह्युम पाईप या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून  काम करणारे उमाकांत महाजन हे शिवराज कॉम्प्लेक्समध्ये राहण्यास आहेत. ते शनीवारी ( ता. 19) रोजी रात्री घरी आले. त्यांना आज (रविवारी) कार्यालयात नेण्यासाठी त्यांचा सहाय्यक इम्रान जमीर पठाण हे महाजन यांचेकडे आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.

Web Title: Firing on four wheeler crime

टॅग्स