लोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार

संजय आ.काटे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

श्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याची घटना घटली. हे प्रकरण रात्री उघडकीस आले. दुपारी लुटीच्या साहित्याची बॅग व गॅस सिलेंडर मिळाल्यावर गोळीबाराची चर्चा पुढे आल्याने मोठी दहशत पसरली. दरोडेखोर नेमके काय लुटण्यासाठी आले होते, याची निश्चित माहिती समजली नाही. पोलिसांनी घटनास्थळी जात साहित्य ताब्यात घेत चौकशी सुरु केली.

घटनेची माहिती देताना पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले, सोमवारी रात्री साडेअकरा वाजणेच्या सुमारास गावातील काही तरुणांना स्टेट बँकेच्या शाखेजवळ दोन जण दिसले. त्या तरुणांना संशय आल्याने त्यांनी अजून काही सहकाऱ्यांना फोन करुन बोलाविले. समोर असणाऱ्या दोन ते तीन जणांनी त्या तरुणांना पाहताच नगर-दौंड रस्त्याने पळायला सुरवात केली. मात्र, गावातील मुलांना संशय आल्याने त्यांचा पाठलाग सुरु केला. त्याचवेळी त्या आरोपींनी या तरुणांच्या दिशेने गावठी कट्टयातून फायर करीत तेथेच जवळ असणाऱ्या नाल्यातून खाली उतरले.  फायर झाल्याने तरुण घाबरल्याने घटनेची कोणाकडेही वाच्यता करण्यात आली नाही. 

मात्र, आज सकाळी पारगावसुद्रीक रस्त्यालगत एक बॅग, गॅस सिलेंडर आढळल्याने पोलिसांनी खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गॅस सिलेंडरसह, कटर, ऑक्सिजन सिलेंडर, दोन कटावण्या, सहा नवे एक्साब्लेड, चेहऱ्याला लावण्याचे सहा मास्क आढळून आले.

 दरम्यान, हे सर्वजण नेमके काय लुटण्यासाठी आले होते, हे अद्याप समजू शकले नाही. बँक लुटीसाठी आले होते,  याबाबतचा तपास सध्या सुरु असल्याची माहिती पोवार यांनी दिली.

Web Title: Firing by robbers at Lonavikankhath