दि. बारामती सहकारी बँक लिमीटेडचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

चंद्रकांत देवकते
रविवार, 22 एप्रिल 2018

मोहोळ येथील दि. बारामती सहकारी बँक लि. या शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला. या शाखेचे उद्घाटन 22 एप्रिल 2017 ला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खाली खासदार धनंजय महाडीक यांचे अध्यक्षतेखाली झाले होते.

मोहोळ (जि. सोलापूरय़) - येथील दि. बारामती सहकारी बँक लिमीटेड या बँकेच्या मोहोळ शाखेचा प्रथम वर्धापनदिन शनिवार ता. 21 एप्रिल ला  संपन्न झाला. यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री सुभाष जांभळकर, सुरेश देवकाते, कपिल बोरावके, विजयराव गालिंदे, जनरल मॅनेजर विनोद रावळ, मोहोळचे शाखाधिकारी सिध्देश्वर शिरसेट्टी आदी उपस्थित होते.

मोहोळ येथील दि. बारामती सहकारी बँक लि. या शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला. या शाखेचे उद्घाटन 22 एप्रिल 2017 ला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खाली खासदार धनंजय महाडीक यांचे अध्यक्षतेखाली झाले होते. तर याच उद्घाटन सोहळ्याबरोबर लॉकर्स कक्षाचे आ. बबनदादा शिंदे यांचे हस्ते तर ए.टी.एम. कक्षाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.

एक वर्षाच्या कालावधीत या मोहोळ शाखेत 3 कोटी 63 लाख रूपयाच्या  ठेवी जमा झाल्या असुन कर्जदारांना 1 कोटी 6 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. आज मितीला 393 बचत खाती असुन 100 चालू खाती आहेत. तर 32 आवर्तक ठेव आहेत. बँकींगच्या सर्व सुविधा व सेवा दि. बारामती सहकारी बॅकेने उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच या बँकेने ग्राहकामध्ये  विश्वासार्हता निर्माण केली आहे. यासाठी शाखाधिकारी सिध्देश्वर शिरसेट्टी यांच्यासह डी. के. शिंदे , एस. आय. फुटाणे, उमेश पाचणकर, समाधान जगताप, वसंत चौगुले आदी कर्मचारी प्रयत्नशील आहेत. वर्धापन दिनाचे औचित्य साधत आयोजीत केलेल्या सत्यनारायण महापुजेच्या प्रसादास शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त, राजकीय व्यक्ती यांच्यासह सभासद, ठेवीदार, खातेदार उपस्थित होते.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: first anniversary of Baramati Sahakari Bank Limited