पहिली उचल तीन हजार देण्याची शेकापची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - यावर्षीच्या साखर हंगामात उसाला प्रतिटन पहिली उचल 3000 रुपये मिळावी व अंतिम दर 3700 रुपये मिळावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षातर्फे पुणे येथे साखर आयुक्त बिपीन शर्मा यांना देण्यात आले.

कोल्हापूर - यावर्षीच्या साखर हंगामात उसाला प्रतिटन पहिली उचल 3000 रुपये मिळावी व अंतिम दर 3700 रुपये मिळावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षातर्फे पुणे येथे साखर आयुक्त बिपीन शर्मा यांना देण्यात आले.

यावर्षी सरकारने गेल्यावर्षी इतकीच एफआरपी निश्‍चित केली आहे. साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकार घडला असून, हा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. गेल्यावर्षी साखर उताऱ्यात घट झाल्यामुळे दरही घटले. गेल्या हंगामात कामगारांच्या मजुरीत 20 टक्के व मुकादमाच्या कमिशनमध्ये अर्धा टक्का वाढ झाली. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून तोडणी मजुरांच्या खर्चात 224 रुपयावरून 270 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिटन एफआरपीच्या दरात 85 ते 400 रुपयांची घट होणार आहे. ती न परवडणारी आहे. अनेक साखर कारखाने मनमानी पद्धतीने तोडणी खर्च लावतात. त्यांच्यावर निर्बंध घालावेत. ज्या वेळी एफआरपी शेतकऱ्यांना परवडत नाही. त्या वेळी राज्य सरकार स्वतःच्या अधिकारात सूचित मूल्य घोषित करू शकते. त्यानुसार पहिली उचल 3000 रुपये व अंतिम दर 3700 रुपये प्रतिटन मिळावा, या मागण्या निवेदनात केल्या आहेत.

माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हासहचिटणीस भारत पाटील, केरबा पाटील, अशोक पवार-पाटील, बाबासाहेब देवकर, अंबाजी पाटील, अमित कांबळे, दत्ता पाटील, एकनाथ पाटील यांचा समावेश होता.

Web Title: First installment should Rs. 3000 for sugarcane