श्री समर्थ दूध उत्पादक संस्थेस प्रथम क्रमांक

हुकूम मुलाणी
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मंगळवेढा तालुक्यात दूधाचे उत्पादन घटले असताना या कठीण परिस्थितीवर मात करत येथील श्री समर्थ महिला दूध उत्पादक संस्थेने दूध उत्पादकांना वेळोवेळी मदत केल्यामुळे सलग 6 व्या वर्षी समर्थ महिला दूध उत्पादक संस्थेचा जिल्हा दुध संघाला जिल्ह्यातून जास्तीत जास्त दूध पुरवठा करून प्रथम क्रमांक मिळवला 

सन २०१७-१८  या वर्षात 11 लाख १४ हजार ६०५ लिटर दूध सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला सर्वाधिक दूध पुरवठा केला म्हणून सलग सहाव्या वर्षीही संस्थेचा प्रथम क्रमांक आला. म्हणून संस्था सचिव संतोष कौडूभैरी यांचा सोलापूरात चेअरमन प्रशांत परिचारक यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्हा.चेअरमन मनोहर डोंगरे,संचालक जयंत साळे,औदुंबर वाडदेकर, शिवाजीराव नागणे, मारूती लवटे, संभाजी मोरे, विजय येलपले, दीपक माळी,जिल्हा दूध विकास अधिकारी चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे उपस्थित होते. 

मंगळवेढा येथील एका सामान्य कुटुंबातील संतोष कोंडुभैरी ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन घडावे, त्यांच्या जीवनपध्द्तीत सुधारणा व्हावी यासाठी पिढ्यानपिढ्याच्या दुष्काळावर मात करता यावी म्हणून संतोष कोंडुभैरी यांनी 'श्री. समर्थ दूध डेअरी  संस्थेची स्थापना केली.या संस्थेच्या माध्यमातून दुध व्यवसाय करण्यास शेतकय्रांला परावर्त करून रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या.

Web Title: First Rank to Shri Samarth milk producer