पाणी विकणाऱ्या आधिकाऱ्यांचा पगार आधी बंद करा

nira river
nira river

संगेवाडी(जि. सोलापूर) : उन्हाळी पाळीत आम्हाला पाणी मिळाले नाही, पावसाळ्यातही अद्याप पाणी सोडले नाही, जनावरांना व प्यायला पाणी मिळत नाही तर, डाळिंब बागा कशा धरणार. अहो, पाणी विकणाऱ्या आधिकाऱ्यांचा पहिला पगार बंद करा. नेत्यांनी पाण्याचं राजकारण करणं सोडुन ठरलेलं शेवटाकडुन पाणी तेवढं द्या. अशी आर्त हाक संगेवाडी व परिसरातील शेतकरी करीत आहेत.

संगेवाडी (ता. सांगोला) व परिसरातील शेतकऱ्यांना निरा उजवा फाटा क्रमांक आठला अद्याप पाणी मिळाले नाही. उन्हाळी हंगामातीलही पाणी येथील शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. 

ऑगस्ट महिना मध्यावर आला तरी या परिसरातील संगेवाडी, मांजरी, मेथवडे, शिरभावी, मेटकरवाडी, धायटी, खर्डी, हालदहिवडी परिसरात पाऊस झाला नाही. विहीरी व विंधन विहीरींनी तळ गाटला आहे. शेतकऱ्यांनी पाऊस नाही व नीरा उजवा फाट्यास पाणी नसल्याने अद्याप डाळिंब बागेचा बहार धरला नाही. उन्हाळी हंगामातील पाण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी पंढरपूर विभागीय कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. निरा उजवा फाट्यातील पाणी एकीकडे मुबलक तर दुसरीकडे वणवण दिसुन येते. अधिकारी वर्गही पाणी नियोजन करण्यात निष्क्रिय होत आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी ऐन पावसाळ्यातही आंदोलन करावे लागत आहे. आता डाळिंब बहार धरण्यास उशीर झाला तर शेवटी उन्हाळ्यात बागांना पाणी कमी पडते. त्यामुळे आता निरा उजवा पाण्याचे नियोजन झाले नसल्याने याचा मोठा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. 

सध्या सगळीकडेच पुराने थैमान घातले असताना या परिसरातील शेतकरी पावसाची व निरा उजवा कालव्याच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अगोदर शेतकऱ्यांच्या शेतजमीनींना पाणी द्यावे व नंतरच वेगवेगळी तळे भरुण द्यावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांनाच अगोदर मिळाले पाहिजे यासाठी आधिकाऱ्यांनीच पाठपुरावा करावा. आमच्या हक्काचे पाणी वेळेवर आम्हाला न मिळाल्यास पंढरपूर कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करावे लागेल असेही शेतकऱ्यांनी सांगितले.


आधिकारी बोलण्यास तयार नाहीत 
निरा उजवा पाण्यासंदर्भात पंढरपूर विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. आधिकाऱ्यांच्या गलथानामुळेच पाण्याचे नियोजन होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

 उन्हाळ्यातही आम्हास पाणी मिळाले नाही.
टेल टु हेड पाणी देण्याचे बंधनकारक असताना टेलकडील आम्हा शेतकऱ्यांना अध्यापही पाणी मिळाले नाही. आधिकारी वर्ग कशा प्रकारे पाणी नियोजन करताना हे सांगावे. लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करावे लागणा 
- बाळासाहेब भुसे, शेतकरी ,संगेवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com