एव्हरेस्ट बेसकॅम्पमध्ये होणार मानवी शरीरावरील परिणामाचे संशोधन!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सोलापूर : सोलापुरातील 360 एक्‍सप्लोरर ग्रुपमार्फत जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर एव्हरेस्ट बेसकॅम्पवर ट्रेकचे आयोजन केले असून येत्या 27 एप्रिल रोजी सोलापूरमधून टीम नेपाळसाठी कूच करणार आहे. सोलापूरमधून एव्हरेस्ट बेसकॅम्प मोहिमेसाठी जाणारी ही पहिली टीम आहे. या मोहिमेदरम्यान मानवी शरीरावर समुद्र सपाटीपासून सर्वोच्च उंचीचा काय परिणाम होतो याचे संशोधन होणार असल्याची माहिती मोहिमेचे आयोजक, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेकमध्ये एव्हरेस्टवीर आनंदसह सोलापुरातील डॉ. सुनील कट्टे, माधवी मिनासे, बालाजी जाधव, किरण जाधव, वैभव ऐवळे, बाळकृष्ण जाधव, संगमनेर येथील सागर गोपाळे आदी सहभागी होत आहेत. एव्हरेस्टवीर आनंद हे सध्या फिजिक्‍स विषयात पी.एच.डी. करत असून एव्हरेस्ट बेसकॅम्प मोहीमेत मानवी शरीरावर समुद्र सपाटीपासून उंचीचा काय परिणाम होतो याचे संशोधन होणार आहे. उंचीवर रक्तात तसेच शारीरिक होणार बदल अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे सोबत नेण्यात येणार आहेत. ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या जागतिक गोल्ससाठी समर्पित असून या मोहिमेत विविध सामाजिक विषयांचा जागर केला जाणार आहे. 

मोहीमेत सहभागी होणारे सदस्य गेल्या चार महीन्यापासून शारीरिक कसरत करत आहेत. सह्याद्रीमधील विविध ट्रेकही त्यांनी केले आहेत. उंचीवरील हवेशी सामावून घेण्यासाठी फिटनेसवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. एव्हरेस्ट बेसकॅम्प जवळपास 18 हजार फुट उंचीचा असून या ट्रेकसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. 27 एप्रिल रोजी पनवेल येथून गोरखपूर टीम जाईल. तेथून काठमांडू व लुकला मार्गे एव्हरेस्ट बेसकॅम्पवर ही टीम चढाई करणार आहे. 

पत्रकार परिषदेस डॉ. कट्टे, निखील यादव, करण पंजाबी आदी उपस्थित होते.

Web Title: First team from Solapur to climb Mount Everest