राज्यात पहिल्यांदाच तांबवेतील पुरग्रस्तांना थेट रोख मदत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

 पुरग्रस्तांना मदत देण्याचा अध्यादेश शासनाकडुन कालच काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी करत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तांबवेतील (जि.सातारा) पुरबाधीत कुटुंबांना प्रत्येकी ५ हजारांची रोख मदत थेट हातात सुपुर्द केली.

तांबवे : पुरग्रस्तांना मदत देण्याचा अध्यादेश शासनाकडुन कालच काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी करत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तांबवेतील (जि.सातारा) पुरबाधीत कुटुंबांना प्रत्येकी ५ हजारांची रोख मदत थेट हातात सुपुर्द केली. राज्यात पहिल्यांदाच तांबवे गावातील पुरग्रस्तांना ही मदत सायंकाळी देण्यात आली आहे.  

महापुराने कऱ्हाड शहरासह तालुक्यात थैमान घातले होते. अनेक घरे पाण्यात गेली. अनेकांना स्थलांतरीत करावे लागले होते. त्यामुळे हाहाकार उडाला होता. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसानही झाले होते. तीन दिवसापुर्वी पुर ओसरुन जनजीवन पुर्वपदावर येवु लागले आहे. नुकसानीचे सध्या पंचनामे सुरु आहेत. अशा पुरबाधीतांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने कालच नुकसान भरपाई म्हणुन पाच हजार रुपये रोख आणि उर्वरीत रक्कम खात्यावर जमा करण्याचे आद्यादेश जारी केली आहे.

त्याची दखल घेत जिल्हाधिकारी सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी खराडे आणि तहसीलदार वाकडे यांनी पूरग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही आजच सायंकाळपासुन सुरु केली आहे. तांबवे गावाला चारीबाजुने वेढा घातल्याने बोटीतुन गावात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. गावातील अनेक घरे पडली असुन अजुनही पडझड सुरुच आहे. सातारा जिल्ह्यातील तांबवे गावात महापुराने मोठे नुकसान झाले आहे. त्याचा विचार करुन प्रांताधिकारी खराडे, तहसीलदार वाकडे यांनी आजच गावातील समद मणेर, सरुबाई कोळे, प्रकाश सुतार, बाळासो सुतार, दुलेखान मणेर, रेहाना मणेर, रघुनाथ साठे, भगवान साठे, जयसिंग साठे, सुभाष मदने यांना प्राथमिक स्वरुपात पाच हजारांचे मदत थेट हातात सुपुर्द केली. यावेळी मंडलाधिकारी नविंद्र भांदिर्गे, तलाठी जी.एच. दराडे  आदी उपस्थित होते. उर्वरीत पुरग्रस्तांना टप्याटप्याने मदत बॅंकेत दिली जाईल असेही प्रांताधिकारी खराडे यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time flood survivors are given help in the forn of direct cash