दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण : पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

कऱ्हाड : दुषित पाणी पिण्यात आल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झालेल्या वस्ती साकुर्डी (ता. कऱ्हाड) येथील अनुसया निवृत्ती कणसे (वय ९०) यांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना कृष्णा रूग्णालयात मृत्यू झाला. यंदाचा तालुक्यातील गॅस्ट्रोचा पहिला बळी साकुर्डीत गेल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आठवड्यापासुन सुरु असलेल्या गॅस्ट्रोच्या रुग्णांवर अजुनही उपचार सुरु आहेत. 

वस्ती साकुर्डी येथे आठवड्यापासुन दुषीत पाणी पिण्यात आल्याने अनेक आबालवृध्दांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. एकाच दिवसात ती संख्या 150 च्या जवळपास गेली होती. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली होती. संबंधित रुग्णांवर कऱ्हाडचे वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय आणि सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

जे नवीन रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुपने आरोग्य केंद्राचे पथक गावातच 24 तास तैनात ठेवण्यात आले होते. जे रुग्ण अत्यवस्थ होते त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यामध्ये अनुसया कणसे यांना कृष्णा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्याव आज वस्ती साकुर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने गावामध्ये खळबळ उडाली आहे. 

Web Title: the first victim of gastro infection due to contaminated water