‘फिटनेस टेस्ट ट्रॅक’चे साताऱ्यात आज उद्‌घाटन  

प्रवीण जाधव 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सातारा - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या ‘फिटनेस टेस्ट ट्रॅक’चे उद्या (ता. पाच) उद्‌घाटन होणार असून,  या ट्रॅकवर गुरुवारपासून (ता. सहा) प्रत्यक्षात वाहनांची तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कऱ्हाडला जाण्याची होत असलेली वाहनधारकांची परवड थांबणार आहे. ‘सकाळ’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

सातारा - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या ‘फिटनेस टेस्ट ट्रॅक’चे उद्या (ता. पाच) उद्‌घाटन होणार असून,  या ट्रॅकवर गुरुवारपासून (ता. सहा) प्रत्यक्षात वाहनांची तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कऱ्हाडला जाण्याची होत असलेली वाहनधारकांची परवड थांबणार आहे. ‘सकाळ’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत होत असलेल्या काही चुकीच्या कार्यपद्धतीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्यातील काही उपप्रादेशिक परिवहन विभागांकडे वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्‍यक असलेला ‘ब्रेक टेस्टिंग ट्रॅक’ नसल्याचे समोर आले होते. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत ट्रॅकची सोय उपलब्ध करावी, अन्यथा संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने फिटनेस प्रमाणपत्र देणे बंद करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ३१ जानेवारीपासून सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातारा, फलटण, खंडाळा, वाई, जावळी, महाबळेश्‍वर, कोरेगाव, खटाव, माण तालुक्‍यांतील वाहनधारकांची पंचाईत होत होती. त्यावर उपाय म्हणून कऱ्हाड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ही तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा टेस्ट ट्रॅक निर्मितीचा प्रस्ताव  एक वर्षापासून लालफितीच्या कारभारात लटकला होता. त्याला नुकतीच परवानगी मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वर्ये (ता. सातारा) येथील दोन हेक्‍टर जमीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आली आहे. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाने संबंधित टेस्ट ट्रॅकच्या उभारणीच्या खर्चाचा आराखडा तयार करण्याबाबतचे पत्रही दिले आहे. 

दरम्यानच्या काळात वाहनधारकांची होणारी परवड थांबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी कार्यालयाच्या आवारातच टेस्ट ट्रॅक उभारणीबाबतचा निर्णय घेतला व त्यानुसार तातडीने काम सुरू केले. याबाबत सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे हा ट्रॅक बांधून पूर्ण झाला असून, उद्या त्याचे उद्‌घाटन होणार आहे. परवापासून प्रत्यक्ष फिटनेसच्या टेस्ट घेण्यास सुरवात होणार आहे.

दोन टप्प्यांत तपासणी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ट्रॅकवर टेस्ट घेताना कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागणार आहे. त्यामुळे दोन टप्प्यांत फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे. सकाळी सात ते दहा या कालावधी रिक्षा व टॅक्‍सी या लहान वाहनांची तपासणी होणार आहे. दहा ते दुपारी अडीचपर्यंत नवीन वाहन नोंदणीचे काम केले जाणार आहे. अडीचनंतर ट्रक व अन्य मोठ्या वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले. त्याचबरोबर वर्ये येथील ट्रॅकच्या बांधणीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: fitness test track inaugurated in Satara today