पाचशे थकबाकीदारांना पालिकेची जप्तीची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

सातारा - विविध लोकप्रतिनिधींच्या कोंडाळ्यात राहणारे शहरातील उद्योजक, व्यापारी, काही डॉक्‍टर यांच्यासह सहकारी, खासगी बॅंका, शैक्षणिक संस्था आदींनी सातारा नगरपालिकेचा सुमारे 14 कोटींचा मिळकत कर थकविला आहे. या कराच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने 500 थकबाकीदारांना जप्तीची नोटीस काढली आहे. सुमारे 12 हजार मिळकतदारांकडे हा कर थकला आहे. 

आजपर्यंत सुमारे 12 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला असून, अद्याप 14 कोटींची थकबाकी आहे. परिणामी, आगामी काळातील विकासकामांना निधीची कमतरता भासू शकले, तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे 90 टक्के कर वसुली होणे अपेक्षित आहे. पालिकेचे बहुतांश कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने प्रशासनाला उपलब्ध मनुष्यबळावर काम निभावून न्यावे लागत आहे. हे कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर पालिकेच्या वसुली कामाला गती येईल. 

शहरातील 34 पैकी सुमारे 22 हजार मिळकतदारांनी जुन्या दराने थकबाकी भरून नव्या दर आकारणीच्या विरोधात अपील दाखल केली आहेत. उर्वरित 12 हजार मिळकतदारांकडे पालिकेचे सुमारे 14 कोटी रुपयांचा कर थकला आहे. या थकबाकीदारांमध्ये शहरात राहणारे काही उद्योजक, व्यापारी, डॉक्‍टरांसह सहकारी, खासगी बॅंका, शैक्षणिक संस्था, तसेच राजकीय क्षेत्राशी लागेबांधे असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. पालिकेची थकबाकी न भरल्यास एखादी खोली, फ्लॅट अथवा घरातील किमती साहित्य जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येईल, अशा आशयाची जप्तीची नोटीस पालिकेने काढली आहे. 

आकडे बोलतात...! 
- साताऱ्यातील एकूण मिळकतदार- 32 हजार 
- पैकी थकबाकीदार- सुमारे 12 हजार 
- एकूण थकबाकी- 14 कोटी रुपये 
- न्यायालयीन बाब, शिक्षण मंडळ व सरकारी येणी- साडेचार कोटी 
- जप्ती वॉरंट जारी- 500 थकबाकीदार

Web Title: Five defaulters Corporation seizure notice