भारताच्या पाच खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

आजपासून मुख्य फेरीला प्रारंभ 
आज झालेल्या पात्रता फेरीतील सामन्यात रम्या नटराजन हिने रशियाच्या इवजनीजा हिचा 7-6, 6-3 असा पराभव केला. पहिला सेट रम्याने केवळ एक गुणांनी जिंकला. नंतर तिने इवजनीजाला सामन्यत परतूच दिले नाही. मुख्य फेरीतील एकेरीच्या पहिल्या फेरीचे सामने उद्या सकाळपासून खेळविले जातील. 

सोलापूर : प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात भारताच्या पाच खेळाडूंनी स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. भारताच्या रम्या नटराजन हिने रशियाच्या इवजनीया बुर्दीना हिला कडवी झुंज देत 7-6 (3), 6-3 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. तर, भारताची सोहा सादिक हिने थायलंडच्या पुन्नीन कोवापिटुकटेड हिचा पराभव केला. 

हेही वाचा : बापरे! पेट्रोल, डेझेलपेक्षा खायचे तेल महाग

सोलापुरातील कुमठा नका येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जिल्हा असोसिएशनच्या मैदानावर प्रिसिजन ओपन जागतिक मानांकन महिलांच्या लॉन टेनिस स्पर्धा सुरू असून ही 25 हजार अमेरिकन डॉलरची आहे. आज तीन कोर्टवर पात्रता फेरीतील सामने खेळविण्यात आले. उद्यापासून स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना सुरवात होईल, तर दुहेरीचेही सामने उद्याच होणार आहेत. सोलापूरची खेळाडू प्रगती सोलनकर ही दुहेरीत आपले नशीब अजमावणार आहे. भारताचीच आकांक्षा निटुरे हिच्या जोडीने ती चीनच्या जोडीचा सामना करणार आहे. 

हेही वाचा : शिक्षिकेच्या आत्महत्येचे गूढ कायम 

स्पर्धेच्या पात्रता फेरीचा निकाल 
रम्या नटराजन (भारत) वि. वि. इवजनीया बुर्दीना (रशिया) 7-6 (3), 6-3, स्टेफी कर्रुथेर्स (सामोआ) वि. वि. पूजा इंगळे (भारत) 6-1, 6-1, फ्रेया ख्रिस्ती (ग्रेट ब्रिटन) वि. वि. परीन शिवेकर (भारत) 6-1, 6-4, वैदेही चौधरी (भारत) वि. वि. झील देसाई (भारत) 6-4, 5-7, 10-2, सोहा सादिक (भारत) वि. वि. पुन्नीन कोवापिटुकटेड (थायलंड) 3-6, 6-4, 10-8, महक जैन (भारत) वि. वि. हुमेरा बेगम शेख (भारत) 6-4, 6-1, व्लाडा कटीच (इस्त्राईल) वि. वि. प्रतिभा नारायण प्रसाद (भारत) 6-2, 6-1, जेनिफर लुईखेम (भारत) वि. वि. दीक्षा मंजू प्रसाद (भारत) 7-6 (5), 6-4. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Indian players enter mainstream