शिक्षिकेच्या आत्महत्येचे गूढ कायम 

सचिन सातपुते
सोमवार, 2 डिसेंबर 2019

सुनंदा श्रीधर भागवत (वय 33, रा. एरंडगाव, ता. शेवगाव), असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या वरूर (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या. 

शेवगाव : शहरातील खंडोबानगर येथे माहेरी आलेल्या शिक्षिकेने घरात गळफास घेऊन आज दुपारी आत्महत्या केली. सुनंदा श्रीधर भागवत (वय 33, रा. एरंडगाव, ता. शेवगाव), असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या वरूर (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या. 

मृत सुनंदा यांच्या मागे सासू-सासरे, पती, दोन मुलगे, असा परिवार आहे. थाटे येथील शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर भागवत हे त्यांचे पती होत. वडील बाबासाहेब थोरात नुकतेच पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले. एक भाऊ शिक्षक, भावजय शिक्षिका, तर दुसरा भाऊ भूमिअभिलेख अधिकारी आहे. 
खंडोबानगर परिसरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ सुनंदा भागवत यांचे वडील बाबासाहेब थोरात राहतात. 

हेही वाचा मोटारकारने दोन महिलांना चिरडले 

छताला गळफास घेतला 
आज दुपारी बाराच्या सुमारास आराम करण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जात असल्याचे सुनंदा यांनी आई-वडिलांना सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना बोलावण्यासाठी कुटुंबीय गेले असता, छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुनंदा आढळून आल्या. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एरंडगाव येथे रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांच्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 
 

आवश्‍य वाचा नगरची सर्वाधिक कमाई 

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही 
दुपारी घरातील खोलीमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी गळफास घेतला. अचानक घडलेल्या घटनेने नातेवाईक हादरून गेले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी मृत्यूचे कारण अद्यापसमोर आलेले नाही. 

बारकाईने तपास सुरू 
शिक्षिकेने आत्महत्या नेमकी का? केली, यासंदर्भात बारकाईने तपास सुरू आहे. लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल आणि आत्महत्येचे कारण समजू शकेल. 
- रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक, शेवगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mystery of the suicide remains