कोल्हापूरः उत्तूर येथे व्यापाऱ्याचे सव्वा पाच लाख रुपये चोरीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

एक नजर

  • उत्तूर येथील एका हाॅटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याचे पाच लाख बावीस हजार पाचशे रुपये चोरीस
  • रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बसस्थानकाजवळ घटना
  • राजेंद्र शिवाजी मगदूम  (वय - ३१, रा. बुद्धीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव)  यांची पोलिसात फिर्याद. 

उत्तूर -  येथील एका हाॅटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याचे पाच लाख बावीस हजार पाचशे रुपये चोरण्यात आले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकाजवळ ही घटना घडली.  याबाबत राजेंद्र शिवाजी  मगदूम  (वय - ३१, रा. बुद्धीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव)  यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मगदूम हे फुलाचे व्यापारी आहेत. गोवा येथून फुलाच्या विक्रीचे पैसे वसूल करुन आंबोली आजरा - उत्तूरमार्गे चिक्कोडीकडे ते मोटारीतून जात होते. उत्तूरमध्ये चायनीज सेंटर समोर गाडी उभी करून ते हाॅटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले. यावेळी मधुकर बाळू मगदूम  हा त्यांचा भाऊही त्यांच्यासोबत होता. मगदूम यांनी पैशाची बॅग शेजारीच असणाऱ्या खुर्चीवर ठेवली व नाष्टा करुन झाल्यांनतर दोघेजण काऊंटरवर पैसे देण्यासाठी गेले. पैसे देवून पुन्हा ते जागेवर परत आले तेंव्हा त्यांना बँग चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत हाॅटेल चालक व आसपासच्या व्यक्तींसोबत चाैकशी केली पण बॅगबाबत कोणासही कल्पना नव्हती. बॅगेची चोरी झाल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five lakh rupees bag stolen in Uttur Kolhapur