पाच मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्प उभारणार

पाच मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्प उभारणार

मोहोळ : मोहोळ शहर व वाडया वस्त्यासाठी लागणाऱ्या दररोजच्या विजेसाठी, मोहोळ नगरपरिषद पाच मेगावॅटचा सौरउर्जा विज प्रकल्प राबविणार असुन त्यासाठी सुमारे पंचवीस कोटी खर्च अपेक्षीत आहे. तशा आशयाचे निवेदन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना पुणे येथे दिले असुन, त्यासाठी त्यांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली. दरम्यान, शहरवासीय व वाडयावस्त्यावरील नागरीकांना, माहिन्याला दोनशे युनीट विज मोफत मिळणार आहे. 

या संदर्भात अधिक माहिती देताना बारसकर म्हणाले, शहराला दररोज चार मेगॅवैट विज लागते, अहमदनगर व दिल्ली येथील प्रकल्पाच्या पाश्वभुमीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी वीस एकर जागा अपेक्षीत आहे.

तयार झालेली विज ही विद्युत महापारेषणला विक्री करण्यात येणार आहे. महापारेषण ने ती ग्राहकांना वितरीत करावयाची आहे. पाहिल्या दोनशे युनीट पर्यंत ग्राहकांना विज मोफत दिली जाणार आहे. मोफत विजेचे पैसे वजा करून, शिल्लक पैसे महापारेषण ने नगरपरिषदेच्या खात्यावर वर्ग करावयाचे आहेत. जी कंपनी हा प्रकल्प राबविणार आहे, त्यांच्याकडुन पाचवर्ष देखभाल दुरुस्तीची सेवा मोफत दिली जाणार आहे.

मलकापुर व कोल्हापूरच्या धर्तीवर, शहरातील प्रत्येक कुटुंबाला पाण्यासाठी नळजोडणी देण्यात येणार असून, नळाला मिटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी बचत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com