खोटे रिपोर्ट दिल्याने डॉक्टरांसह पाच पॅथॉलॉजिस्टना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

कऱ्हाड - लघवी तपासणीचे खोटे रिपोर्ट देवून फसवणूक केल्याबद्दल येथील एका डॉक्टरसह पाचजणांना दोन वर्षे सक्त मजुरी व प्रत्येक दोन हजार अशी शिक्षा फौजदारी न्यायाधीश टी. आर. गोगले यांनी आज ठोठावली. 

पॅथॉलॉजिस्ट डॉ.एम.बी.पवार, जितेंद्र शिबे, नारायण चव्हाण, दीपक काळे व शशांक हर्डीकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे, असे सरकारी वकील एन. बी. गुंडे यांनी सांगितले. सुमारे सहा वर्षापूर्वी संजय गायकवाड (रा. परभणी) यांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी त्यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावर निकाल देण्यात आला.

संजय गायकवाड कामानिमित्त 6 फेब्रुवारी 2012 रोजी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी त्यांना लघवीचा त्रास जाणवला होता. त्यांनी लाईफलाईन लॅबमध्ये तपासणीसाठी नमुना दिला होता. त्यावेळी त्यांना पॅथॉलॉजिस्ट नसतानाही रिपोर्ट देण्यात आले. त्यांनी चौकशी केली असाता रिपोर्टवर डॉ.एम.बी पवार यांचे असून, प्रत्यक्षात डॉक्टर तेथे नसल्याचे त्यांना जाणवले. गायकवाड यांनी डॉ. पवार यांना भेटण्याची विनंती असता डॉ. पवार उपस्थित नसल्याचे त्यांना समजले. डॉ. पवार तेथे नसतानाही त्यांच्या सहीचे रिपोर्ट देण्यात आल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. 

दरम्यान, त्यांनी दुसऱ्या लॅबमधून लघवी तपासणी केली त्यावेळी त्यांच्या रिपोर्टमध्ये फरक जाणवला. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली. फौजदार व्ही. बी. पाटील यांनी तपास सुरु केला असता, डॉ. पवार यांना वगळून दोषारोपत्र दाखल केले. त्यावेळी आक्षेप घेत गायकवाड यांनी फेरतापसाची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी त्याचा फेर तपास केला. त्यावेळी त्यांनी पुरवणी दोषारोपपत्रात डॉ. पवार यांच्यासह पाचजणांवर गु्न्हा दाखल केला. अॅड. एन. बी. गु्डे यांनी सरकार पक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासले. साक्ष व वकीलांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून डॉ. पवार यांच्यासह अन्य पाचजणांना फसवणूकीबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली. 

Web Title: Five pathologist & doctor got Punishment for giving false reports