जनाब, अब दिल्ली दूर नहीं...गाडी मिळेना म्हणून पाच तरूण पुण्याहून निघालेत सायकलवर

Five young people are on a bicycle from Pune as they do not get a car
Five young people are on a bicycle from Pune as they do not get a car

संगमनेर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाली. राज्यातील सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा बंद झाली. कोरोनाच्या भीतीमुळे परप्रांतीय कामगार व मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे पाच परप्रांतीय मजूर पुण्याहून दिल्लीकडे सायकलवर निघाले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने परप्रांतीय मजुरांनी गावची वाट धरली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहती, बांधकाम व अन्य क्षेत्रांत अशा मजुरांचा मोठा भरणा आहे. सद्यःस्थितीत सर्व कामे ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे मूळचे दिल्ली येथील मनीषकुमार, शेखर, सूरज, हिरालाल आणि शुभम यांनीही मायभूमीला जाण्याचा निर्णय घेतला. असंख्य अडचणींतून त्यांनी कसा तरी कोल्हापूर ते पुणे प्रवास केला. पुण्यातून दिल्लीपर्यंतचा पुढील प्रवास करण्यासाठी त्यांनी नवीन सायकली खरेदी केल्या. रस्त्यावरील गावांमध्ये मिळणाऱ्या अन्नपाण्याच्या भरवशावर आळे फाट्यामार्गे मार्गक्रमण करीत ते काल (सोमवारी) सकाळी चंदनापुरी येथे आले. तेथील ग्रामस्थांना आपली कर्मकहाणी सांगितली. 

कोल्हापूरला थांबलो असतो, तर खायचे वांधे झाले असते. घरच्यांची ओढही स्वस्थ बसू देईना. त्यामुळे सायकलीवरून दिल्ली गाठण्याचा निर्धार त्यांनी केला. खाण्या-पिण्यासह असंख्य अडचणी आहेत; पण त्यातून मार्ग काढत घरी पोचण्याची आशा त्यांना आहे. कोल्हापूर- पुणेमार्गे थेट दिल्लीपर्यंतच्या सुमारे 1200 किलोमीटरच्या प्रवासाला ते निघाले आहेत.

दिवसेंदिवस निर्बंध अधिक कडक होत असताना, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत त्यांचा आत्मविश्‍वास मात्र बुलंद असल्याने, "अब दिल्ली दूर नहीं..' अशी भावना त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com