Independance Day : कऱ्हाडला मदरशात ध्वजवंदन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

वाघेरी येथील मदरसा इनामुल उलुममध्ये येथील प्रसिद्ध डाॅ. हेमंत ताम्हणकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. येथे सकाळी सव्वाआठ वाजता कार्यक्रम झाला.

कऱ्हाड : वाघेरी येथील मदरसा इनामुल उलुममध्ये येथील प्रसिद्ध डाॅ. हेमंत ताम्हणकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. येथे सकाळी सव्वाआठ वाजता कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, संस्थचे अध्यक्ष साजीद पटेल उपस्थित होते. 

ताम्हणकर म्हणाले, प्रत्येकाने चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत जाणुन घेवुन चांगल्या बाबींना सहकार्य केले पाहिजे. जागतिक शांती निर्माण होण्यासाठी आपण सारे जास्तीत जास्त चांगले होऊ या, इतरांना चांगले घडवू या. डाॅ. ताम्हणकर यांचे नगरसेवक फारुक पटवेगार यांनी स्वागत केले. एन के पटेल यानी सूत्रसंचालन केले.

Web Title: Flag Hosted in Madarashya