येरळवाडीतील फ्लेमिंगोची पक्षीप्रेमींना मोहिनी

अंकुश चव्हाण
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

कलेढोण - वरून पांढरे आतून लाल पंख, उंच पाय, लांब चोच, इंग्रजीतील 'एस' आकाराची मान, केळीच्या आकाराची चोच असलेल्या फ्लेमिंगोनी (रोहित, अग्निपंख) गुलाबी थंडीत पक्षीप्रेमीना मोहिनी घातली आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम तलावावर परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी कोल्हापूर, सांगली, पुणे, कराड आदी. भागातून पक्षीप्रेमी दुर्बीण व कॅमेरे घेऊन त्याची छवी टिपण्यासाठी हजेरी लावत आहेत.

दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पावर नोव्हेंबर ते मार्चदरम्यान पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो दाखल होतात. तालुक्यात कमी पावसामुळे अनेक तलावात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असलातरी तलावावर अनेक विहार करताना परदेशी व स्थानिक पक्षी दिसत आहे. त्यांच्या निरीक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, सांगलीसह जिल्ह्यातून पक्षी प्रेमी दाखल होत आहेत. त्यात वरून पांढरा आतून लाल पंख, उंच पाय, लांब चोच, इंग्रजीतील 'एस' आकाराची मान, केळीच्या आकाराची चोच असा रोहित पर्यटकांवर मोहिनी घालताना दिसत आहे. तलावाच्या पूर्वेला (बनपुरी हद्दीत ) दलदलीच्या भागात हा पक्षी लहान खेकडे, मासे, किटक, ओटोलिया वनस्पतीच्या शोधात मुक्त विहारताना दिसत आहेत. तर त्यांची छबी दुर्बिणीच्या व कॅमेराच्या मदतीने टिपण्यासाठी पक्षीप्रेमी सकाळ-संध्याकाळ तलावावर हजेरी लावत आहेत. तलावात सुरु असलेल्या मासेमारीमुळे हे पक्षी आपली जागा वारंवार बदलत असताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ होत आहे. तलावात फ्लेमिंगोबरोबर नदीसूरय, स्पून बिल, ग्रे हेरॉन, कवड्या खंड्या, चांदवा, पांढरापरीट, पाणकावळा, पाणबुडी, पाण पाकोळी, शराटी, शेकाट्या आदी.पक्षांनी हजेरी लावल्याने तलाव परिसर गजबजला आहे. आहे.

लपनगृहाची गरज
तलाव परिसराच्या पूर्व, उत्तरभागात झाडांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी येणारे पक्षीप्रेमी समोरासमोर व पक्षी यांची समोरासमोर येत आहेत. त्यासाठी तालुका पाटबंधारे विभाग व वनविभागाच्या समन्वयाने येथे तात्पुरती लपनगृहे उभारण्याची गरज आहे. 
- प्रा. महेश जंगम (पक्षीप्रेमी -विटा)  

Web Title: Flamingo birds in Yeralwadi