फ्लेक्स बंदीचा विचार स्वागतार्ह; हवी कृतीशीलतेची गरज 

flex
flex

कऱ्हाड : ज्यांच्या ओठावरही मिशा आलेल्या नसत्यात अशा काही पोरखेळांच्या दादा, काका, बाबासह सरकार, सावकर अन् कधीही भाई सारख्या लागणाऱ्या फ्लेक्सवर सरसकट बंदी आणण्याची पालिकेच्या विशेष सभेत चर्चा झाली. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी त्या विषयावर तोफ डागली, त्याला दोन ते तीन नगरसेवकांनी सहमती दाखविलीही. बंदीचा विषय स्वागतार्ह आहेच, मात्र खऱ्या अर्थाने फ्लेक्सवर बंदी येणार की, त्यातही पळवाट शोधून काहीतरी गोलमाल होणार शहराचे याकडे लक्ष आहे. शहराचे विद्रूपीकरणासह अऩ्य विविध कारणाने वादग्रस्त ठरणाऱ्या फ्लेक्सवर निश्चीत बंदी आलीच पाहिजे. ती आणण्यासाठी पालिका सकारात्माक पाऊल उचलेललही, त्यासाठी लोक प्रतिनिधींनी आता त्यांच्या इच्छशक्तीला जोर देवून शहराचे भले होण्याचा निर्णय, घेण्याची गरज आहे, असे सामान्यांचे मत आहे. 

शहरात लागणारे फ्लेक्स शहराच्या सौंदर्यात बाधा आणत आहेत. विद्रुपीकरणाला कारणीभुत ठरताहेत. शहराच्या वाहतूकीलाही अनेकत फ्लेक्स अडथळे ठरत आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा वाढदिवाला लागणाऱ्या फ्लेक्सबाबत पालिकेने कडक निर्णय झाले होते. त्याची अमंलबजावणीही तितकीच कडक होत होती. व्यक्तीपरत्वे कारवाईत ढिलाई येतेच तो अनुभव येथेही आला. मात्र आता पुन्हा एकदा त्या विषयाने उचल खाल्ली आहे. फ्लेक्सने शहरात होणारे विद्रुपीकरण त्यासाठी कारमीभूत आहे. त्यामुळे तो विषय पालिकेच्या विशेष सभेत चर्चेत आला. त्याबाबत ज्येष्ठ नगरसेवक श्री. पावसकर यांनी जोरदार टिका करत तोफ डागली. त्यांनी जी स्थिती मांडली ती शहरातील सद्दस्थितीच आहे. कोणताही वाढदिवस असली तरी पालिकेत परवानगी असते काही मोजक्याच ठिकाणची परवानगी अन् प्रत्यक्षात फ्लेक्स लावलेले असतात हजाराच्या घरात. एका वाढदिवासाला किमान पाचशे तर कमाल दोन हजार पल्क लागलेलेल असतात. त्यात तो वाढदिवस नेत्याचा असेल तर बोलूच नये, अशी स्थिती दिसते. पोलिस जर त्याबाबत काही चौकशी करायला गेले तर कार्यकर्ते इतके शहाणे आहेत की, पालिकेची परवानगी घेतली आहे, असे सांगून त्यांच्यावर राजकीय दबाव आणून ती वेळ मारून नेतात. नंतर ना पालिकेचा माणूस ते फ्लेक्स तपासायला येतो न वाढदिवस साजरे करणारे त्यांची खरी माहिती पालिकेत देत नाहीत. त्यामुले सावळो गोंधळची स्थिती आहे. असा स्थितीत हाच विषय पालिकेच्या अजेंड्यावर आला आहे. तो अजेंड्यावर आलाय तर खरा मात्र मासिक बैठकीत येईल की, नाही ते कोणीच सांगू सकत नाही. आलाच मासिक बैठकीत चर्चेत तर पळवाट काढून मांडला जातोय की, अशी भिती खुद्द अधिकाऱ्यांनाही आहे. 

फ्लेक्सबाबत यापूर्वी एकदा बंदीचा निर्णय झाला होता. त्यावेळी फ्लेक्स लावयला खड्डा काढायचा नाही. असा नियम रूढ केला होता. त्यावेळी पालिकेच्या जागेत फ्लेक्स लावण्यास बंदी होती. खासगी ठिकाणी फ्लेक्स लावला तरी त्याच्याकडून जाहीरात कराची आखरमी केली जात होती. प्रत्येक फलकावर त्याला मिळालेला परवाना नंबर, त्याचा कालवदी व तो केंव्हा काढला जाणार आहे. याचा तपशील असाय़चा. मात्र फ्लेक्स बाबात ज्य़ांनी निर्णय गेतला. त्यांची बंदली झाल्यानंतर पन्हा ये रे माझ्या मागल्या सारखी अवस्था झाली आहे. वाढदिवासासह शहरात वेगवेगळ्या कारणाने लागणाऱ्या फ्लेक्समुळे शहर विद्रुप होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारेच कोणी नाहीत, अशी अवस्था झाली आहे. पालिकेतून केवळ परवानगी घेतली तर घ्यायची. आठवड्याच्या कर भरायचा अन् महिन्यापेक्षाही जास्त कालवधीसाठी तो फ्लेक्स त्याच ठिकाणी ठेवायचा, हीच येथील आत्ता रूढ झालेली पद्धत आहे. येवून त्याची अमंलबजावणी होईपर्यंत लोकांना वाट पहावी लागणार आहे. कोणत्याही दिवासनिमित्त लागणाऱ्या फ्लेक्सचे फॅड आले कोठून अन् त्याला खतपाणी घालणारे कोण, याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे पालिकेच्या बैठकीत झालेला विचार स्वागतार्ह आहे. तो प्रत्यक्ष अमंलबजावणी उतरला पाहिजे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com