मायबाप सरकार, आम्ही गहू तसेच खायचे का?

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

राज्य सरकारकडून मदत म्हणून अन्नधान्याची पाकिटं पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जात आहेत. त्यावरून पूरग्रस्त संतप्त प्रतिक्रिया देत असून, नुसत्या पाकिटांमुळे काय होणार? ते घेऊन काय करणार?, असा संतप्त सवाल केला जात आहे.  

कोल्हापूर : राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे महापुराचे संकट आले आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मदत म्हणून अन्नधान्याची पाकिटं पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जात आहेत. त्यावरून पूरग्रस्त संतप्त प्रतिक्रिया देत असून, नुसत्या पाकिटांमुळे काय होणार? ते घेऊन काय करणार?, असा संतप्त सवाल केला जात आहे.  

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय वीज पुरवठाही खंडित झाला आहे. घरे वाहून गेली. अनेकांचे जीव गेले. 

दरम्यान, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री, मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे काढले आहेत. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली. मात्र, पूरग्रस्तांना मदत म्हणून आम्ही गहू दिले. आता ते खायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Peoples Aggressive After Food Aid By Government