सांगली, कोल्हापुरातील २९ वीज उपकेंद्रांना महापुराचा फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५९ हजार ७८३ व सांगली जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८२२ ग्राहकांचा वीजपुरवठा पुरामुळे ठप्प झालेला आहे. बुधवारी (या. ७) मध्यरात्रीपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत मिळून महावितरणची २९ वीज उपकेंद्रे व ५५८२ रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाळी, नागाळा पार्क, गांधीनगर, बापट कॅम्प, शुगरमील, कांचनवाडी, राशिवडे, राधानगरी, वाळवा,  हासणे, धामोड, आवाडे मऴा, शिरदवाड, तुडिये, शिर्टी ही वीज उपकेंद्रे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या बहुतांश वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे.

वीज उपकेंद्रातील अतिउच्चदाबाचे रोहित्र, कन्ट्रोल पॅनल, फिडर पॅनल, उपकेंद्राला येणाऱ्या व जाणाऱ्या वाहिन्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर ओसरेपर्यंत वीज यंत्रणा चालू करता येत नाही. शिवाय ते धोक्याचेही आहे. वीज नसल्याने पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याची महावितरणला जाणीव आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी उपाययोजना तोकड्या पडत आहेत.

पूरग्रस्त भाग वगळता इतर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. जनतेने अर्थात वीजग्राहकांनी वीज यंत्रणेच्या मर्यादा व जोखीम लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलातर्फे करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood hit 29 power stations in Sangli, Kolhapur