कोल्हापूर : अपार्टमेंटमधील हजारो नागरिक पुरात अडकल्याची भीती; बचावासाठी टाहो

कोल्हापूर : अपार्टमेंटमधील हजारो नागरिक पुरात अडकल्याची भीती; बचावासाठी टाहो

कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या महापुराचा पाण्यात शहराच्या विविध अपार्टमेंटमधील एक हजार लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  सोमवारी मध्यरात्रीपासून अग्निशमन दलाकडे आलेल्या वर्दीवरून आकडेवारी काढण्यात आली आहे  अग्निशमन दलाकडे सहा बोटी असून या बोटीतूनच मदत कार्य सुरू आहे. 

एकावेळी सहा बोटीतून केवळ 60 जणांना सुखरूप आणता येते त्यामुळे बोटींची संख्या कमी आणि मदत मागणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाला कसरत करावी लागत आहे

कोल्हापूर शहरामध्ये पावसाचे तांडव सुरू असून अद्याप पावसाने उघडीप दिलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशामन दल 24 तास मदत कार्य करत आहे. या दलाकडील जवान गेल्या तीन दिवसांपासून घरी गेले नाहीत तरीदेखील न थकता त्यांचे मदतकार्य सुरू आहे.

विशेषत: कोल्हापूर शहरातील खानविलकर पेट्रोल पंप, हरी पूजा नगर, महावीर कॉलेजचा पाठीमागचा परिसर केवी स्पार्क पाटलाचा वाडा, रमणमळा, न्यू पॅलेस, माळी मळा, सन सिटी,  डायमंड हॉटेलच्या पाठीमागचा परिसर,  विन्स हॉस्पिटल लगतची अपार्टमेंट, भोसलेवाडी, कदमवाडीतील आपारमेंट,  मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, काटेमळा येथील अपार्टमेंट येथे दोनशे कुटुंबातील सुमारे एक हजार लोक अडकल्याचा महापालिकेच्या अग्निशमन दलाचा अंदाज आहे. 

दोन दिवसांपासून आणि अग्निशमन दलाचे दूरध्वनी सतत खणखणत आहेत. वर्दीवर वर्दी येत आहेत. लोक मदतीची अक्षरशा याचना करत आहेत, पण प्रशासन देखील हतबल आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ दोनच बोटी आहे आमदार सतेज पाटील, राजेश लाटकर, राहुल माने यांच्या टीमने आणखीन चार बोटी मिळवल्या आहेत. अशाप्रकारे सहा बोटीतून मदतकार्य सुरू आहे. या सर्व अपार्मटमेंटमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. पाणी वाढत जाईल, तशी लोकांच्यात भीती वाढत आहे. 

जादा बोटींची गरज

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ सहाच बोटी आहे तर 35 ते 40 कर्मचारी आहेत. काही कार्यकर्त्यांच्या मदतीने हे मदतकार्य सुरू आहे. पण पुरामध्ये अडकलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वरच्या मजल्यावर जाऊन बसा घाबरू नका बोट येईपर्यंत वाट पहा. असेच आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. लोक मात्र भीतीने गांगरले आहेत. अडकून पडलेले सर्व नागरिक सुशिक्षित कुटुंबातील आणि अपार्टमेंटमध्ये राहणारे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सूचना देऊनही या नागरिकांनी बाहेर पडण्यास नकार दिला होता.  आता मात्र हेच लोक मदतीची याचना करत आहेत. जादा बोटी आल्याशिवाय एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना मदत करण्यास प्रशासन देखील हात बरा आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com