पुराच्या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क नाही

हुकूम मुलाणी 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रामध्ये एक हजारपेक्षा अधिक टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होते. उपलब्ध पाण्यामधील फक्त सहाशे टीएमसी पाणी महाराष्ट्राला वापरता येत असून उर्वरित पाणी हे कर्नाटकला सोडावे लागणार असल्यामुळे पुराच्या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क नाही अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

मंगळवेढा : पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाने कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरात जादा झालेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागाला देण्याची मागणी करण्यात आली परंतु सद्यस्थितीला ते पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये एक हजारपेक्षा अधिक टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होते. उपलब्ध पाण्यामधील फक्त सहाशे टीएमसी पाणी महाराष्ट्राला वापरता येत असून उर्वरित पाणी हे कर्नाटकला सोडावे लागणार असल्यामुळे पुराच्या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क नाही अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे सध्यस्थितीला तालुक्याची दुष्काळी भीषण परिस्थिती थांबवण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना,पंचगंगा, नीरा आणि भीमा या नद्यांन मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आहे. अशा परिस्थितीत मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागातील  अनेक गावांना दुष्काळाची भीषण तीव्रता अजूनही भेडसावत आहे. तर काही गावात खरिपाची पेरणी झाली त्या पिकाची उगवण होऊन ती पिके सुकू लागले आहेत. अशा परिस्थितीत पिकांची आणि जनावराची जपणूक करण्यासाठी, वाहून जाणारे पुराचे जादा झालेले पाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून  शिरनांदगी तलावातून दक्षिण भागातील वंचित गावाने द्यावे ही मागणी भारत भालके आणि जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी केली होती.

अशा परिस्थितीत या भागातील लोकांचे लक्ष या पाण्याकडे लागले आहे. याबाबत म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांच्याशी संपर्क साधला. तर सध्या म्हैसाळ योजनेचे पंप पूर्णतया पाण्यामध्ये असून पुराचे पाणी कमी झाल्यानंतर त्या पंपात झालेला बिघाड दुरुस्त करणे आवश्यक आहे. पाणी कधी कमी होईल हे आजमितीस सांगता येणार नसले तरी यातील बिघाड शोधला जाईल. मग शासनाची आदेशाने कार्यवाही केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood water does not belong to Maharashtra