करवीर पंचायत समिती कार्यालयात पुराचे पाणी;  दप्तर हलवले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - करवीर पंचायत समितीत शेजारील ओढ्याला पुर आला आहे. या पुराचे पाणी पंचायत समिती कार्यालयात घुसले आहे. समितीच्या सर्व इमारती पाण्यामध्ये आहेत. यामुळे येथील बहुतांश दप्तर जुना राजवाडा येथील मेन राजाराम हायस्कूलमध्ये हलवले आहे . 

करवीर पंचायत समितीत काल रात्री पाणी घुसले. सकाळी बरेच साहित्य पाण्याखाली गेल्याचे लक्षात येताच, प्रथम कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके,  महत्त्वाच्या फाइल्स मेन राजाराम हायस्कूलमध्ये नेण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या वाहनांमधून हे साहित्य मेन राजाराम हायस्कूलमध्ये पोहोचविले. यानंतर उर्वरित सर्व रेकॉर्ड मेन राजाराम हायस्कूलमध्ये नेण्यात आले.

सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संजय अवघडे यांच्यासह कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव, अजित मगदूम, निलेश म्हाळुंगेकर, शैलेश पाटणकर, चंद्रशेखर ओतारी, सुनिल साळोखे ,मनिषा कोरडे, शशिकांत कदम यांच्यासह अनेक कर्मचारी या मोहिमेत लागले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water enters in Karveer Panchayat Samitti office