#KaradFlood कराडमधील पूर ओसरतोय; काेयनेचे दरवाचे 14 फुटांवर

#KaradFlood कराडमधील पूर ओसरतोय; काेयनेचे दरवाचे 14 फुटांवर

काेयना धरणाचे दरवाजे दाेन फुटाने कमी केल्याने कराड शहरातील पूराची पााण्याची पातळी चार फुटाने कमी झाली आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे आवाहन प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे. 
कराड शहरात कृष्णा, कोयनाचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. ते दत्त चौकापर्यंत आले होते पण आता ते चार फुटांनी कमी झाले आहे.
कोयना, धोम, या धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कोयना आणि कृष्णा नद्यांमध्ये विसर्ग करावे लागत आहे. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे काेयना धरणाचे दरवाजे 16 फुटावरुन 14 फुटावर आणण्यात आले आहेत. त्यामुळे पूराची पातळी कमी हाेत आहे.
तथापि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्या नंतर अलमट्टी धरणातून सकाळी सहा पासून चार लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे झपाट्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे.
कराड शहरातील दत्त चौकापर्यंत आलेले पाणी सकाळी नऊ पर्यंत चार फुटांनी ओसरले आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन खराडे यांनी केले आहे. दरम्यान काल (मंगळवार) रात्रीच एन.डी.आर.एफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. जिथे आवश्यकता भासेल तिथे हे पथक पाठविले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com