नीरा अन् भीमा नदीच्या पुरामुळे पिकांची नासाडी

दावल इनामदार
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

-  पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातुन नीरा आणि भीमा नदीला सोडण्यात आले.

- तर पाण्याच्या विसर्गाने सोलापुर-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गारील बेगमपुर - माचणूरच्या पुलावरून दोन ते तीन फूटाने पाण्याचा विसर्ग होता.

- त्यामुळे बुधवारी संध्याकाळी  मंगळवेढा - सोलापूर वाहतूक बंद करण्यात करण्यात आली.

ब्रह्मपुरी : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातुन नीरा आणि भीमा नदीला सोडण्यात आले. तर पाण्याच्या विसर्गाने सोलापुर-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गारील बेगमपुर - माचणूरच्या पुलावरून दोन ते तीन फूटाने पाण्याचा विसर्ग होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी  मंगळवेढा - सोलापूर वाहतूक बंद करण्यात करण्यात आली.

माचणुर येथील सिद्धेश्वर मंदिरात आणि आवाराबाहेर पाणी घुसल्यामुळे  दर्शनासाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता. आज सकाळी गुरुवारी पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून पुलावरुंन पाणी वाहत होते. नदी काठच्या शेतातील पाण्याला तळयाचे स्वरुप आले असून पिकांची नासाढ़ी झाली आहे. त्यमुळे एकीकडे सततच्या दुष्काळी संकटाला सामोरे जात असताना ऐन पाण्याच्या पुरामुळे सर्व नदी भागातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

मंगलवेढा -सोलापूर ला जाण्याचा संपर्क तुटला असून अनेक वाहनांची या मार्गावर रीघ लागली होती.  पर्यायी सोलापुरला चडचंण, झळकी मार्गाने जाताना खासगी वाहतुकीने प्रवाशांना तिकिटाला दुप्पट दराने पैसे देण्याची वेळ आली.

दरम्यान आज हवामान खात्याने  पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे उजनी धरणातून जादा पाणी सोडण्यात आले. तामदर्ड़ी  गावचा संपर्क तूटला असून माचणुर -राहटेवाडी-बोराळे मार्गावर आणि नदी काठी न जाण्याचा सतर्कचा आदेश प्रशासनच्या वतीने देण्यात आला आहे. पुरस्थळी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods of nira and bhima river ruined crop fields