फुल शेती करून पाच लाख रुपयांचे उत्पादन

flower
flower

मोहोळ : अनेक समस्यांवर मात करीत शेती करणे म्हणजे सध्या अवघड आहे, त्यात वीज, पाणी व मजूर या कायमच्या समस्या शेतीसमोर आहेत. यावरही मात करून अंकोली (ता. मोहोळ) येथील सविता दत्तात्रय पवार या महिला शेतकऱ्याने विविध जातीच्या फुलांची फुल शेती करून आज पर्यंत विविध विक्रीतुन पाच लाख रुपयांचे उत्पादन घेऊन, इतर शेतकऱ्यासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपली प्रगती साधत मजुरांच्या माध्यमातून दहा जणींच्या प्रपंचालाही हातभार लावला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सविता पवार यांची अंकोलीत शेती आहे. नफा-तोटा व शेतीतील राबणूक याचा विचार केला, तर पारंपारिक पद्धतीने शेती करणे परवडत नाही, हा विचार करून त्यांनी आपल्या सात एकर क्षेत्रावर मोगरा, गुलछडी, गुलाब व लीली या जातीच्या फुलांची लागवड केली आहे. अत्यंत कमी पाण्यावर ठिबक सिंचनाचा वापर पवार यांनी करून फुल शेती फुलवली आहे .पाणी असेल तर बारमाही फुल शेती करता येते, केवळ दर कमी जास्त मिळतो एवढेच. सध्या उन्हाळा आहे, तसेच लग्नसराई आहे त्यामुळे मोगरा गुलछडी गुलाब या फुलांना मोठी मागणी आहे. तर सत्कारासाठी लिली या जातीच्या फुलांना मागणी आहे, ठिबक सिंचन चांगले असेल व ते योग्य पद्धतीने चालविले तर चार तासात सात एकर क्षेत्र गार होते असा दावा पवार यांनी केला आहे.

त्यांनी आपली प्रगती साधत तोडण्यापासून ते बाजारात विक्रीला पाठवे पर्यंत दररोज दहा मजूर लागतात. असल्या दुष्काळातही दहा मजुरांच्या प्रपंचाला हातभार लावला आहे .आजपर्यंत सुमारे पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे, मात्र आणखी किमान दहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले.

सविता पवार (महिला शेतकरी अंकोली)
सध्या व्यापारी पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे .बाजारात कशाला मागणी आहे तेच पिकवावे लागते .थोडेसे नियोजन व कष्टाची तयारी असेल तर शेती अवघड नाही .आजच्या युवतीनी व युवकांनी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे.

सुमन घंटे (शेत मजुर )
गेल्या तीन माहिन्यापासुन आंम्हाला या फुल तोडणीच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध झाला आहे. माझे संपुर्ण कुटुंबच या कामात आहे, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत.

बाजारातील आजचे फुलांचे दर प्रतिकिलो 
मोगरा--400
गुलछडी--300
गुलाब-- 20 रुपये पेंढी ( सात नग)
लीली -- 10 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com