मंगळवेढा : निवडणुकीनंतर आता चारा छावण्यांकडे लक्ष

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 25 एप्रिल 2019

छावणीसाठी दाखल 58 पैकी 29 गावात 37 छावण्या सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली. पण तोकड्या अनुदान जाचक अटीमुळे छावणी चालकांनी चालवण्यास नकार दिला असून याबाबत पुर्नविचार करावा. या मागणीचे निवेदन सभापती प्रदीप खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानी दिल्यावर यातील काही मागण्याबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करत अखेर छावण्या सुरू करण्यास कार्यारंभ आदेश देण्यात आला.

मंगळवेढा : निवडणुकीच्या रणधुमाळीची कामगिरी चोख बजावल्यानंतर महसूल प्रशासनाने आता जनावरे छावण्याकडे लक्ष केंद्रित केले असून प्रस्ताव दाखल केलेल्या गावाच्या चौकशीअंती तेवीस गावात छावण्या सुरू केल्या असून या छावण्यांमध्ये आजअखेर 10396 जनावरे दाखल झाली आहेत. सर्वाधिक छावण्या आंधळगाव महसूल मंडळांमध्ये सुरू झाल्या.

छावणीसाठी दाखल 58 पैकी 29 गावात 37 छावण्या सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली. पण तोकड्या अनुदान जाचक अटीमुळे छावणी चालकांनी चालवण्यास नकार दिला असून याबाबत पुर्नविचार करावा. या मागणीचे निवेदन सभापती प्रदीप खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानी दिल्यावर यातील काही मागण्याबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करत अखेर छावण्या सुरू करण्यास कार्यारंभ आदेश देण्यात आला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी महसूल प्रशासनाकडे अनेक पदे रिक्त असतानाही निवडणुकीची मोठी जबाबदारी होती. पण शांततामय मार्गाने कुठेही गालबोट न लागता आपले काम चोख बजावल्यानंतर छावणीकडे लक्ष केंद्रित केले.

सध्या सुरू छावण्यामध्ये पाटखळ, खुपसंगी, जालिहाळ, हिवरगाव, आंधळगाव, जुनोनी, हुन्नुर, गोणेवाडी,शिरसी, नंदेश्वर, महमदाबाद (शे), खडकी, मारोळी, लक्ष्मी दहिवडी, हुलजंती, लेंडवेचिंचाळे, लोणार या गावात 23 छावण्या सुरु झाल्या. अन्य प्रस्ताव दाखल केलेल्या गावात महसूल प्रशासनाकडून स्थळ पाणी करून छावणी सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. 2012 13 च्या दुष्काळात गुन्हे दाखल असलेल्या ठेवण्याचे पडताळणी केली जात आहे. या निमित्ताने त्यामुळे छावणीत होणाऱ्या गैरप्रकारास पूर्णपणे आळा घालण्याचे नियोजन महसूल प्रशासनाने केले आहे.
 यामुळे जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करुन चार महिने उलटून गेले तरीही जनावरांच्या छावण्यांसाठी निर्णय होत नव्हता.पशुपालकामधून संताप व्यक्त केला जात होता. आता छावण्या सुरू झाल्यामुळे सुरू झाल्यामुळे पशुपालकातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: fodder camp starts in Mangalwedha