esakal | डोक्यावरचा पदर लोकांसमोर पसरण्याची वेळ आलीय; तमाशा कलावंतांची आर्त साद
sakal

बोलून बातमी शोधा

डोक्यावरचा पदर लोकांसमोर पसरण्याची वेळ आलीय; लोंढे मावशीची खंत

डोक्यावरचा पदर लोकांसमोर पसरण्याची वेळ आलीय; लोंढे मावशीची खंत

sakal_logo
By
दिलीप क्षीरसागर

कामेरी (सांगली) : डोक्यावरचा पदर हातात घेऊन फडात लावणी नाचायची त्यावेळी पैशाची उधळण लोक करत होते. मात्र आता तोच पदर लोकांच्या समोर पसरावा लागतो आहे. अशी खंत तमाशा कलावंत सिताबाई लोंढे दहिवडी ता. तासगाव (Tasgaon) यांनी व्यक्त केली या लोंढे मावशीच्या बरोबरच सांगली जिल्ह्यात पारावर हंगामी तमाशा करणाऱ्या जवळजवळ चारशे कलाकारांची परवड सुरू झाली आहे. (folk-art-tamasha-dying-art-lockdown-impact-sangli-marathi-news)

कोरोनामुळे गेली दोन वर्ष ग्रामीण भागातील जत्रा- यात्रा बंद आहेत. त्यामुळे गावच्या कट्ट्यावर उभारणारा तमाशा फड बंद झाला आहे. सांगली जिल्ह्यात कासेगाव, किल्ले मच्छिंद्रगड, काळमवाडी ,खरसुंडी शिरडोण ,नागज ,तिसंगी तासगाव ,पाचेगाव,दहीवडी,दुधोंडी या गावात तमाशा मंडळ आहे. या अकरा तमाशा मंडळात जवळपास तीनशे महिला पुरुष कलाकार आहेत.

ग्रामीण भागातल्या यात्रा-जत्रा पूर्ण पुणे बंद झाल्या. त्यामुळे झाडाखालचा तमाशा बंद झाला . तमाशाच्या गण-गवळीतून लोकांना हसविणा-या या कलाकारांना रडण्याची वेळ आली आहे .हंगामी कलावंतांची मोठी उपासमार चालू झाली आहे. त्याचबरोबर तमाशा फडही बंद असल्यामुळे फड मालकास ही मोठा फटका बसला आहे. काही फड मालकांचे तमाशाचे वाद्य व इतर साहित्य धूळ खात पडले आहे. कलाकारांना या फड मालकाकडून मानधन दिले जायचे मात्र आता गावजत्रा बंद असल्याने सारे काही थांबले आहे. यामुळे फड मालक ही मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. अनेक फड मालकांनी यापूर्वीच काही कलाकारांना उसनवार पैसे दिले आहेत. मात्र हे परत कसे मिळणार याची धास्ती लागली आहे. काही कलाकारांना कलाकार मानधन मिळते ते ही महिन्याच्या महिन्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होते.

हेही वाचा- सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

तमाशा कलावंत सीताबाई बबन लोंढे या म्हणाल्या, माझे पती बबनराव दहिवडीकर यांचा तमाशा फड होता. मात्र पतीचे निधन झाले त्यानंतर माझ्यावर ही जबाबदारी पडली. माझी मुलगी सीमा अकलूजकर ही कला जिवंत ठेवण्याचे काम करत आहे . ज्यावेळी आम्ही डोक्यावरचा पदर हातात घेऊन लावणी करत होतो त्यावेळी लोक पैशाची उधळण करत होते. मात्र आता तोच पदर लोकांच्या समोर शासनासमोर पसरण्याची वेळ आली आहे. तर या सरकार मायबापांन आम्हा कलावंतांना दाद द्यावी.

लोकसंस्कृतीची जोपासना करणा-या व, जनतेला हसवणाऱ्या या तमाशा कलावंतावर उपासमारीने रडण्याची वेळ कोरोनाने आली आहे. या संकटकाळात शासनाने आणि समाजाने मदत करावयला हवी याच बरोबर कलावंतांची नावे दारिद्र्य रेषेखालील घालावीत. कलावंताना घरकुल , वैद्यकीय उपचारांसाठी मदत, वृध्द कलाकारांना पेन्शन सुरू करावी. जोपर्यंत तमाशा करायला परवानगी मिळत नाही तोपर्यंत पाच हजार रुपये महिन्याला मदत मिळावी तमाशा फड मालकांना अनुदान शासनाने द्यावे तरच ही कला जीवंत राहील

भास्कर सदाकाळे,राज्य संस्थापक अध्यक्ष,उमा बाबाजी हंगामी तमाशा कलाकार मंडळ

loading image