esakal | सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जत : जतचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमाजीराव धानाप्पा सनमडीकर काका यांचे आज मंगळवारी पहाटे 6:30 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने सांगली येथे उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात काँग्रेस तळागाळात पोहोचवली.

सुरूवातीला सैन्यातून निवृत्त होताच त्यांना जत पंचायत समिती सदस्य पदाची संधी मिळाली. यानंतर श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांनी प्रथम १९८४ साली पहिली विधानसभा निवडणूकीत संधी दिली. ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले. पुन्हा १९८९ साली जतची जागा रिपाइंला सोडण्यात आली. त्यावेळी उमाजीराव सनमडीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. अपक्ष म्हणून ते निवडून आले.

हेही वाचा: भीषण अपघातात व्यावसायिक जागीच ठार; इचलकरंजीतील घटना

१९९४ साली विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. यानंतर ही त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग ठेवला. पुन्हा काँग्रेसच्या चिन्हावर १९९९ ला ते विजयी झाले. यानंतर २००२ मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली. यानंतर त्यांचा राजकीय सहभाग कमी होत गेला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सांगली येथे उपचारा दरम्यान त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दुपारी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी जत येथील सनमडीकर हॉस्पिटलमध्ये ४ ते ६ या वेळेत ठेवण्यात येणार आहे तसेच अंत्यविधी सनमडी (ता. जत) येथे सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांचे सुपुत्र डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली आहे.

loading image