मोजकेच स्टॉल शिल्लक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - "सकाळ'ने आयोजित केलेल्या कोल्हापूर फूड फेस्टिव्हलसाठी स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक असून इच्छुकांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन "सकाळ' परिवाराने केले आहे. सासने मैदानाजवळील महाराणी लॉन (किरण बंगल्याशेजारी) येथे 17 फेब्रुवारीपासून सलग चार दिवस हा खाद्ययात्रा महोत्सव रंगणार आहे. 

लोकल टू ग्लोबल सर्व प्रकारची खाद्यसंस्कृती येथे एकाच छताखाली अवतरणार आहे. कोल्हापुरी मटण, पांढरा-तांबडा रस्सा, झुणका-भाकर, दही-खरडा-भाकरीपासून ते तरुणाईला भुरळ घालणारी सर्व प्रकारची खाद्यसंस्कृती येथे अवतरणार आहे. त्याशिवाय विविध जाम-सूपपासून बिस्कीट, विविध सरबते, लोणची-पापड, मसाले, पॅकिंग राईस, फिश, खाद्यतेल, नमकिन्स, फिंगर चिप्स आणि मुखवासांपर्यंतची फूड प्रॉडक्‍टस्‌ही महोत्सवात उपलब्ध असतील. खवय्यांबरोबरच आपले प्रॉडक्‍ट अधिकाधिक कोल्हापूरकरांपर्यंत पोचवण्यासाठी विविध फूड कंपन्यांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे. चला, तर मग आजच स्टॉल बुकिंग करू या. अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज-9922551918, संतोष - 9975513951. 

प्रायोजकांविषयी 
फूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध हिरा रोलर अँड फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड महोत्सवाचे मुख्य प्रायोजक तर यश बेकर्स-रावसाहेब वंदुरे ग्रुप सहप्रायोजक आहेत. हिरा ग्रुप ऑफ कंपनीज्‌ एफएमसीजी क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे; तर बेकरी प्रॉडक्‍टस्‌ क्षेत्रातील पश्‍चिम महाराष्ट्रातील आयएसओ मानांकित ही कंपनी आहे. सोलाईफ न्यूट्रीशियस सोया प्रॉडक्‍टस्‌ न्यूट्रीशन पार्टनर आहे. पोषक आणि आरोग्यदायी प्रॉडक्‍टस्‌ असलेल्या या कंपनीची लवकरच कोल्हापुरात शॉपी सुरू होणार आहे. न्यू गणेश कॅंटीन सर्व्हिसेस कॅंटीन पार्टनर आहे.

Web Title: food festival in kolhapur