आहार बनवण्याच्या मानधनात वाढ

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 10 जुलै 2018

सातारा - आहार तयार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात २५० रुपयांवरून ५०० रुपये अशी दुप्पट वाढ करण्याबरोबरच आहारासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

सातारा - आहार तयार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात २५० रुपयांवरून ५०० रुपये अशी दुप्पट वाढ करण्याबरोबरच आहारासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर स्त्री व स्तनदा मातांना एक वेळच्या चौरस आहार देण्यात येतो. त्यामध्ये लाभार्थीला प्रती दिन सरासरी २५ रुपये खर्च देण्यात येत होता. सध्या कच्च्यामालाच्या किमती वाढल्याने आहार तयार करण्यासाठीची रक्कम अपुरी पडू लागली. त्यामुळे त्यात वाढ करण्याची मागणी होती. त्यानुसार शासनाने आता दहा रुपयांची वाढ करून ३५ रुपयांपर्यंत नेला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्यावर आहार शिजवून तो लाभार्थीपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना पगाराव्यतिरिक्त प्रतिमहा प्रत्येकी २५० रुपये मानधन देण्यात येत आहे. ही योजना प्रभावीपणे राबवून कुपोषणाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देण्यात येणाऱ्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. टप्पा दोन अंतर्गत सात महिने सहा वर्ष वयोगटातील बालकांना अंडी, केळी देण्यात येतात. त्याचा दरही 
पाच रुपयांवरून सहा रुपये करण्यात आला आहे.

आहार खर्चाची माहिती प्रसिद्ध करणे अनिवार्य
या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील १०५ एकात्मिक बाल विकास प्रकल्पांगर्तत असलेल्या अंगणवाड्या व आहार तयार करणाऱ्या सेविकांना दिला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी खर्चाचे लेखे नियमितपणे अद्यायवत करून आहार समितीच्या द्वारे ग्रामसभेत सादर करणे, तसेच आहार समितीने या योजनेची व आहार खर्चाच्या सुधारणेची माहिती अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. 

Web Title: food maker honorarium increase