जिल्ह्यात अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

सातारा - अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात खाद्यतेल, दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबर विविध खाद्यपदार्थांच्या तपासणीच्या माध्यमातून अन्नपदार्थांचा दर्जा प्रमाणित राखण्याचे प्रयत्न केले आहेत. अप्रमाणित खाद्यपदार्थांबाबत दंडात्मक कारवाईतून दबाव वाढविण्याबरोबर प्रबोधनावरही भर दिल्यामुळे एकंदर अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम राखण्यात यश आले आहे.

खाद्यतेलाचे चार छापे
आर्थिक वर्षात खाद्यतेलाचे एकूण ४२ नमुने घेण्यात आले. त्यामध्ये आठ कमी दर्जाचे आढळून आले. भेसळीच्या संशयावरून चार ठिकाणी छापे टाकून एक लाख ९६ हजार ४०८ रुपयांचे १६२५ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.

पेढ्यांच्या दर्जावर लक्ष
सातारी कंदी पेढा हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे निर्मात्यांची संख्याही वाढली आहे. त्यांच्या दर्जावर नियंत्रण राहण्यासाठी विभागाने विविध कालावधीत ३५४ पेढ्यांची तपासणी केली.  त्यामध्ये ८२ जणांना दर्जा सुधारण्याची नोटीस देण्यात आली. तर, सात पेढे उत्पादकांचे परवाने निलंबित करण्यात आले. ३२ प्रकरणांमध्ये तडजोड दाखल करून त्यामध्ये एक लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन प्रकरणे न्यायनिर्णयासाठी पुणे कार्यालयात पाठविण्यात आली. त्यातील एकात २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पाण्याचे परवाने निलंबित
बाटलीमधील पाण्याचा वापर वाढला आहे. ग्राहकांना योग्य प्रतीचे पाणी मिळावे याकडेही विभागाने सातत्याने लक्ष ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात सात कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. त्यामध्ये दोन लाख ९६ हजार ३९६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तर, कऱ्हाडमधील एक व फलटणमधील तीन अशा चार कंपन्यांचे परवाने सुधारणा होईपर्यंत निलंबित करण्याची कारवाईही करण्यात आली.

यात्रा व सणासुदीत लक्ष
सण व यात्रांच्या कालावधीत खाद्यपदार्थांची मागणी वाढत असते. या कालावधीत भेसळीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे विभागाने या कालावधी विशेष मोहिमा राबविल्या. त्यामध्ये खाद्यतेलाचे १४, दुधाचे ११, दुग्धजन्य 

पदार्थांचे पाच, रवा, आटा, मैदा, बेसनचे सहा तर, मिठाई व खव्याचे १७ नुमने तपासण्यात आले. एका प्रकरणात ७९ किलो खवा जप्त करण्यात आला. यात्रा कालावधीतही नमुने तपासणीबरोबरच नोंदणी शिबिरेही घेण्यात आली.

जाहिरातींवरही कारवाई
नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींबाबत कारवाई करण्यात आली आहे. राज्य व परराज्यातील पाच कंपन्यांना याबाबत नोटिसा देण्यात आल्या. दोन कंपन्यांतील राईस बेन ऑइलचा पाच हजार २०२ किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दिवसभरात ८७ लाखांची वसुली 
वसुली मोहिमेत पालिकेचे ४२ कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून काम करत आहेत. त्यांनी या काळात शनिवार- रविवार या सुट्याही घेतल्या नाहीत. काल (३१ मार्च) दिवसभरात या कर्मचाऱ्यांनी विक्रमी ८७ लाख रुपयांची वसुली केली. 

Web Title: food quality best in satara district