अन्नसुरक्षा यादीत धनाढ्यांची नावे

- विलास माने
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

गरजू, गरीब लाभार्थी वंचित; मल्हारपेठेसह पाटण तालुक्‍यात गोंधळाचे वातावरण

मल्हारपेठ - अन्नसुरक्षा यादीमध्ये गरीब व वंचित कुटुंबातील लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होण्याऐवजी आर्थिक सक्षम, धनदांडगे, नोकरदार व राजकीय पुढाऱ्यांची नावे समाविष्ट झाल्याचे दिसते. या यादीबाबत मल्हारपेठ परिसरासह पाटण तालुक्‍यातील बहुतांश गावात गोंधळाचे वातावरण आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेत नावे समाविष्ट करण्यासाठी गावकामगार तलाठी व ग्रामसभेच्या ठरावानुसार याद्याचे वाचन करून पात्र, अपात्र लाभार्थी ठरविण्यात येतात. या योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्याला अल्पदराने गहू, तांदूळ, साखर मिळते. मात्र, या योजनेत जमीनदार, व्यावसायिक, धनदांडग्याचा समावेश दिसून येते. या याद्या तयार करण्याचे काम शासनस्तरावर चालू आहे. मात्र, अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहींनी निकष न बघताच नावे समावेश करून घेतली आहेत. मल्हारपेठ महसूल सजा व आसपासच्या गावात या याद्यामध्ये असलेल्या नावावरून गोंधळ आहे. त्यात आर्थिक सक्षम असणाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. व्यावसायिक, आर्थिक सक्षम असणाऱ्या पुढाऱ्यांचा यादीत समावेश झाला आहे.

गावपातळीवर उत्पन्नाचा निकष न लावता ही नावे समाविष्ट होतात, कशी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. गावनिहाय या याद्यांचे पुनरुवाचन करण्यात यावे आणि योग्य निकष लागूनच लाभार्थी निवडावेत, अशी सर्वसामान्य नागरिकांतून मागणी होत आहे.

Web Title: Food Security in the list of names rich people

टॅग्स