निनाम पाडळीत बिबट्याचे दर्शन ; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची घटनास्थळास भेट 

निनाम पाडळीत बिबट्याचे दर्शन ; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची घटनास्थळास भेट 

नागठाणे : परिसरातील पाडळी (निनाम, ता. सातारा) येथील गावालगतच्या मळा नावाच्या शिवारात काल सायंकाळी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडले. आज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. 

पाडळी गावालगतच्या पुलानजीक मळा नावाचे क्षेत्र आहे. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील लोक घरी परतत होते. अशात त्यांना अगदी समोरच, जवळून बिबट्याचे दर्शन घडले. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने झुडपात धूम ठोकली. उपस्थितांनी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढाणे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर श्री. ढाणे यांनी बोरगाव पोलिस तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. 

दरम्यान, आज वनाधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक महेश सोनावले यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी बिबट्याच्या पायांच्या ठशांची त्यांनी पाहणी केली. दत्तात्रय ढाणे, सागर ढाणे, अजित ढाणे, विक्रम ढाणे, किरण ढाणे, अलिम कुरेशी, उमेश कुंभार आदी उपस्थित होते. 
परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्यास पिंजरा लावण्यात येईल, 
असे यावेळी सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com