येडशीतून वाघ उत्तरेकडे उजनी धरण पाणलोटाच्या मार्गाने जुन्नर किंवा भीमा शंकरच्या जंगलाकडे जाऊ शकेल, अशा शक्यतेनेही वनविभाग वाघावर लक्ष ठेवून आहे.
कोल्हापूर : यवतमाळच्या घनदाट जंगलात लहानाचा मोठा झालेला वाघ पाचशे किलोमीटर अंतर कापत दुष्काळी भागातील येडशी (जि. धाराशिव) अभयारण्यात (Yedshi Sanctuary) आला; मात्र त्याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीय. या वाघाला सुरक्षित अधिवासासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (Sahyadri Tiger Reserve) हलविण्याच्या हालचाली वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत.