नांगोळेत वनसंपदा होरपळण्यापासून वाचली; दक्ष गावकरी, कार्यकर्त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा

The forest in Nangole survived from fire; Diligent villagers, the culmination of the efforts of the workers
The forest in Nangole survived from fire; Diligent villagers, the culmination of the efforts of the workers

रांजणी : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील एका डोंगरपायथ्यावर आग लागली होती. पण गावकऱ्यांची दक्षता व प्रयत्नाने आग थोडक्‍यात आटोक्‍यात आली आणि वनराई बचावली. 

हा तोच भाग जिथे जलबिरादरी संस्थेने दोन वर्षांपासून वनजमिनीवर डीपसीसीटी माती नाला बांध, वनतळे, वृक्षारोपण व मियावाकी वनराई प्रकल्प उभारला आहे. याठिकाणापासून साधारणपणे आठशे ते हजार मीटरवर खासगी मालकीच्या जमिनीवर अज्ञातांनी आग लावली. हा संपूर्ण पट्टा वाळलेल्या गवताचा असल्याने व हवेचा जोर आसल्याने काही मिनीटातच आग पसरली.

स्थानिक शेतकरी व जलबिरादरीच्या कार्यकर्त्यांनी झाडाच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू वाऱ्याचा जोर असल्याने आग विझण्याचे नाव घेईना. जिल्हा वनाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून माहिती देताच त्यांनी वनमजुरांना मदतीसाठी पाठवले. 


अग्नीशमन यंत्रणेला बोलावण्यासाठी संपर्क साधला. मात्र तेथे अशी व्यवस्था नसल्याचे समजले. सगळ्यात जवळची अग्निशमन यंत्रणा जॉलीबोर्ड कारखान्यात आहे. तेथे संपर्क केला असता तेथे पंप दुरूस्तीचे काम सुरू आसल्याचे सांगण्यात आले. नांगोळेतील हॉटेल व्यावसायिक हणमंत कोळेकर यांनी त्यांचे मित्र राकेश कोळेकर यांना सांगून बागेत फवारणी करण्याचा ब्लोअर बोलावून शेतातील पाण्याने भरून ते स्वतः काही मिनिटात घटनास्थळी हजर झाले.


स्थानिक शेतकरी, जलबिरादरीची टीम, इमदाद मल्टीपर्पज फौंडेशनचे कार्यकर्ते, वनमजूर, नांगोळेचे गावकरी, स्थानिक शेतकऱ्यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नाने दुपारी दोनच्या सुमारास आग विझवण्यात यश मिळवले. चार तासांत साधारणपणे 100 हेक्‍टरवरील गवत खाक झाले. आग विझवली नसती तर नांगोळे वनजमिनीवरील वनसंपदा जळाली असती. 


हणमंत कोळेकर, राकेश कोळेकर, विजय गडदे, विठ्ठल मासाळ, माऊली टकले, अस्लेश वाले, राहुल हुबाले, जलबिरादरीचे अंकुश नारायणकर, सागर साळुंखे, बालाजी चव्हाण, इमदाद मल्टीपर्पज फौंडेशनचे अध्यक्ष हाफिज रमजान मुल्ला, यासिन जमादार, रेहान जमादार, जैद इनामदार, हाफिज शोएब, प्रवीण जमगे, वनमजूर विलास शिंदे, भगवान निकम, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com