चोरी करताना मोबाईल विसरून गेला अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या

हुकूम मुलाणी
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - शहरानजीक असलेल्या घाटूळ वस्तीवर भरदिवसा घरफोडी करून 25 हजाराचा मुद्देमाल घेवून पसार झालेला चोरटा पोलिसांनी मोबाईल लोकशेन वरून गजाआड केला. यातील संशयित आरोपी सचिन विठ्ठल सोनवले (रा.लक्ष्मी दहिवडी) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबतची फिर्याद अविनाश पाटील (रा.घाटूळ वस्ती) यांनी दिली. पाटील, बठाण शिवारात असलेल्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. सायंकाळी 4 वा.ते घरी आले असता बंद घराचे कुलूप काढून घरातील सॅमसंग कंपनीचा 10 हजार रूपये किमतीचा टी.व्ही. 10 हजार रूपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, 5 हजार रूपये किमतीचा मोबाईल असा 25 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल भरदिवसा चोरून नेला होता.  

दरम्यान, चोरी करून जाताना घाईगडबडीत चोरट्याचा मोबाईल घटनास्थळी पडला. त्या मोबाईलवरून पोलिसांनी लोकेशन शधले असता तो मोबाईल आरोपी सचिन सोनवले याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लक्ष्मी दहिवडी येथे जावून आरोपीची चौकशी केली असता तो आंबेचिंचोली येथे नातेवाईकांकडे राहत असल्याची माहिती मिळाली. 

पोलिस उपअधिक्षक दिलीप जगदाळे व पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विकास क्षीरसागर, पोलिस शिपाई अलमगीर लतिफ, अनिल दाते, पैगंबर नदाफ आदींनी सदर ठिकाणी जावून अटक केली. त्याच्याकडून टी.व्ही.जप्त करण्यात आला. त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले असून, अजूनही कांही चोर्‍या उघड होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तविण्यात आली.

Web Title: Forgot the mobile while stolen and police arrested him