कोल्हापूरच्या माजी नगरसेवकाला फसवणूकप्रकरणी अटक 

कोल्हापूरच्या माजी नगरसेवकाला फसवणूकप्रकरणी अटक 

कोल्हापूर - वाईन शॉपचा परवाना देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात येथील एका माजी नगरसेवकाला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा रात्री उशिरापर्यंत दिला नव्हता. मात्र, संबंधित नगरसेवकाला पोलिसांनी घरातून घेऊन गेल्याची परिसरात चर्चा होती.  

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित नगरसेवकाचा पूर्वी वाईन शॉपचा व्यवसाय होता. त्याने आपल्याकडील परवाना विकून टाकला. त्यानंतर वाईन शॉपचे परवाने खरेदी-विक्रीचे व्यवहार तो करीत असे. यातूनच त्याची औरंगाबादमधील एका व्यावसायिकाची ओळख झाली. त्याला वाईन शॉप परवाना देतो, असे सांगून त्याच्याकडून त्याने पैसे घेतले. मात्र, परवाना दिला नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाने सिडको (औरंगाबाद) पोलिस ठाण्यात तक्रार केली. यावरून पोलिसांनी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला. दोन आठवड्यांपूर्वी सिडको पोलिस त्याचा शोध घेत कोल्हापुरात आले होते; मात्र तो सापडला नाही. अखेर पोलिसांनी त्याच्या घरातून त्याला अटक करुन औरंगाबादला नेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com