नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.

लाॅटरी विक्रेता लांडे खून खटल्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. एखाद्या गुन्ह्यात आधी शिक्षा झालेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. संदीप कोतकर संदर्भात राज्य सरकारने सीआयडीला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार सीआयडीने सोमवारी दुपारी नाशिक कारागृहात जाऊन कोतकरला वर्ग करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत रात्री त्याला नगर येथे आणले. केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे व संजय कोतकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

या हत्याकांडात आरोपी म्हणून संदीप कोतकर यांच्या नावाचा समावेश होता. तपासात काही बाबी समोर आल्या. त्यावरून कोतकर याला अटक करण्यात आली. कोतकर यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Former Mayor of the Ahmednagar city Sandeep Kotkar arrested