Sudhakar Khade Murder Caseesakal
पश्चिम महाराष्ट्र
मिरजेत राम मंदिराजवळ भाजप नेत्याची निर्घृण हत्या; खाडेंवर कुऱ्हाडीने सपासप वार, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
Sudhakar Khade Murder Case : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे (Sudhakar Khade) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Summary
कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली : भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे (वय ५२, रा. मिरज) यांच्यावर आज सकाळी कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून (Sudhakar Khade Murder Case) करण्यात आला. जमीन विकसक म्हणून व्यवसाय करणारे खाडे आज सकाळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर एका वादग्रस्त जमिनीत कुंपण घालण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. ऐन विधानसभा निवडणूक काळात घडलेल्या या हत्येने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.
