किल्ले, समुद्रकिनारे पर्यटनाचा ब्रँड

सचिन शिंदे
बुधवार, 20 जून 2018

कऱ्हाड - राज्यातील किल्ले व समुद्रकिनाऱ्यांवरील विहंगम दृश्‍य राज्याच्या पर्यटनासाठी ब्रॅण्ड ठरणार आहेत.  तेथील नैसर्गिक दृश्‍यांचा आधार घेऊन पर्यटनाची ‘सुपरहिट महाराष्ट्र’ अशी थीम घेऊन शासनाने पर्यटनाचे धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. या फिल्मद्वारे किल्ले व समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. हे काम डीडीबी मुद्रा कंपनीकडे सोपवले आहे. नऊ कोटी ४२ लाख १३ हजार ७५० रुपयांची तरतूद केली आहे. 

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची रांग व प्रत्येक जिल्ह्यात असलेले मोठे किल्ले महाराष्ट्राची खरी ताकद आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांचीही नैसर्गिक संपत्ती अनेकांना खुणावते. त्याचा राज्यातील पर्यटनासाठी वापरता येतील, असा विचार पुढे आला. त्यातून पर्यटनाबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादरही झाला. त्यात किल्ले व समुद्रकिनाऱ्यांवर फिल्म बनवण्याचे निश्‍चित झाले. पहिल्यांदा ‘मी महाराष्ट्राचा’ असे नाव ठरवण्यात आले. त्यानंतर त्यात बदल करून ते ‘सुपरहिट महाराष्ट्र’ असे झाले. पूर्वीचा खर्च चार कोटी ८५ लाख होता. नव्याने बदल केलेल्या थीमनुसार त्याचे बजेट नऊ कोटींवर गेले. त्यात सात कोटी ८८ लाखांचे निर्मिती मूल्य आहे. राज्यातील किल्ले व समुद्रकिनाऱ्यांवरील दृश्‍यांवर आधारित ‘सुपरहिट महाराष्ट्र’ अशी टीव्हीसी फिल्म तयार केली जाणार आहे. पहिल्या भागासाठी सात कोटी ८८ लाख, तर दुसऱ्या भागासाठी तीन कोटी १८ लाख ९० हजार ९३७ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

‘सुपरहिट महाराष्ट्र’तील महत्त्वाचे...
 एकूण मंजूर निधी- नऊ कोटी ४२ लाख १३ हजार ७५० रुपये
 सुपरहिट महाराष्ट्राचे निर्मिती मूल्य ७ कोटी ८८ लाख 
 पहिल्या टप्प्यासाठी ७ कोटी ८८ लाख 
 दुसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी १८ लाख ९० हजार ९३७ रुपये 
 बहुतांश किल्ल्यांसह समुद्रकिनाऱ्यांची होणार फिल्म 
 फिल्मद्वारे राज्यासह देशात शासन करणार पर्यटनाची जाहिरात 

Web Title: fort sea beach tourism