ग्रामीणमध्ये सापडले 25 पॉझिटिव्ह! 'या' गावांमध्ये आढळले नवे रुग्ण 

0corona_498.jpg
0corona_498.jpg

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी (ता. 6) 25 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून आता रुग्णांची एकूण संख्या 557 झाली असून मृतांची संख्या 26 झाली आहे. 

'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण 
उत्तर सोलापुरातील तिऱ्हे दोन, पाकणीत दोन, हिरजमध्ये दोन, तळेहिप्परगा येथे एक रुग्ण आढळला आहे. तर पंढपुरातील नवीपेठेत एक, सह्याद्री नगर (इसबावी) एक, करकंबमध्ये दोन आणि मोहोळमधील बुधवार पेठेत एक तर सिंकदर टाकळीत एक रुग्ण सापडला आहे. दक्षिण सोलापुरातील नवीन विडी घरकूल परिसरात एक, वळसंगमध्ये एक, करमाळ्यातील जिंतीत दोन, बार्शीतील भवानी पेठ, इंदिरा नगर (कासारवाडी रोड), सुतार नेट (तानाजी चौक), फुले प्लॉट, खांडवी, बाभुळगाव येथे प्रत्येकी एक आणि अक्‍कलकोटमध्ये भारत गल्ली व तळेगवाड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 
अक्‍कलकोट (100), बार्शी (105), करमाळा (6), माढा (11), माळशिरस (6), मंगळवेढा (1), मोहोळ (28), उत्तर सोलापूर (59), पंढरपूर (29), सांगोला (4), दक्षिण सोलापूर (208) अशाप्रकारे एकूण 557 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 223 रुग्ण बर होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरु असलेल्या 308 रुग्णांपैकी माळशिरस, मंगळवेढा आणि सांगोल्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमधील कोरोनाबाधितांची संख्या आता 557 झाली 
  • सोमवारी एकाचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या झाली 26 
  • आतापर्यंत 223 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वीपणे मात 
  • एकूण 308 रुग्णांवर विविध दवाखान्यांमध्ये आहेत उपचार सुरु 
  • सोमवारी मोहोळमधील बुधवार पेठेतील 58 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com