भाजप नेत्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मार्च 2019

आजरा - येथील भाजपचे नेते  रमेश दत्तू रेडेकर यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी सावंतवाडीतील चाैघांनी मागितली होती. या प्रकरणातील चौघांनाही काल येथील पोलीसांनी अटक केली.

आजरा - येथील भाजपचे नेते  रमेश दत्तू रेडेकर यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी सावंतवाडीतील चाैघांनी मागितली होती. या प्रकरणातील चौघांनाही काल येथील पोलीसांनी अटक केली. बाबा उर्फ नेल्सन इस्माईल फर्नांडिस, चेतन विनायक साटेलकर,
यशवंत चंद्रकांत कारीवडेकर, कृष्णा अनिल म्हापसेकर अशी अटक केलेल्या चाैघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सावंतवाडी येथे सापळा रचून पोलिस उपनिरीक्षक सत्यराज घुले, संग्रामसिंह पाटील, अनिल तराल यांनी या चाैघांना ताब्यात घेतले. काल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी श्रीधर शिंगटे या गडहिंग्लज येथील संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. त्या नंतर या चौघांची नावे उघड झाली होती. 

Web Title: Four arrested n connection with ransom case