कोयना धरणाचे चार वक्र दरवाजे उघडले

Koyna Dam
Koyna Dam

काेयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने गेले अनेक दिवसांपासून बंद असलेला धरणाचा पायथा वीजग्रूह चालु करून सुध्दा धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे.

आज (रविवार) धरणाचे चार वक्र दरवाजे एक फुटावर उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात सात हजार 454 कूसेस्क्स पाणी साेडले आहे.

कोयना धरण सध्या पुर्णक्षमतेने भरले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्राच्या सर्वदूर ठिकाणी १७ मिलिमीटर पेक्षा जादा पाऊस झाला तर धरणाच्या जलपातळीत वाढ होते. कोयना धरण पाणलोटक्षेत्रात सध्या कोयनानगर येथे २२ मिलिमीटर , नवजा येथे १९ मिलिमीटर , महाबळेश्वर येथे ३५ मिलिमीटर तर नव्याने चर्चेत आलेले वलवण याठिकाणी ३८ मिलिमीटर अशी आज पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाची जल पातळी २१६३.०४ फूट असून धरणात १०५.०३ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक १२१३१ कूसेस्क्स असल्याने धरणाचा पायथा वीजग्रूहाचे एक युनिट सुरू करण्यात आले आहे.

पायथा वीजग्रुहातुन १०५० कूसेस्क्स पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात येत होता. पायथा वीजग्रूह कार्यान्वित करून सुध्दा पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या सरीवर सरी पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने जलपातळीत वाढ होत असल्याने जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाज्या पैकी चार दरवाजे उचलण्यात आले आहे. 
यामुळे सातारा जिल्ह्यातील नदी काठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com