मधमाश्‍यांच्या हल्ल्यात आजरा तालुक्यात चौघे जखमी

रणजित कालेकर
बुधवार, 10 एप्रिल 2019

आजरा - गवसे (ता. आजरा) येथे मधमाशांनी केलेल्या हल्यात चार जण जखमी झाले. हे सर्व काजू झाडांना पाणी घालण्यासाठी आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला मधला पट्टी नावाच्या शेतात गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

आजरा - गवसे (ता. आजरा) येथे मधमाशांनी केलेल्या हल्यात चार जण जखमी झाले. हे सर्व काजू झाडांना पाणी घालण्यासाठी आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला मधला पट्टी नावाच्या शेतात गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

भागवत ज्योती पाटील, लक्ष्मण ज्योती पाटील, मालती लक्ष्मण पाटील, सुनंदा गोरक्षणात लाड अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये मालती या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर येथील आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रसंगावधान राखून एका शेतकऱ्यांने धुर केल्यामुळे सर्वांची  या मधमाशांपासून सुटका झाली.

दोन दिवसापुर्वी पाटील कुटुंबाची काजूची बाग आगीत जळाली होती. त्यामुळे पाटील कुटुंबीय काजूच्या झाडांना पाणी घालण्यासाठी गावाजवळली मधला पट्टी नावाच्या शेतात गेले होते. तेथे झाडावर आग्या मोहळाचे पोळे होते. या मधमाशांनी पाटील कुटुंबियांवर हल्ला केला.

माश्‍यांपासून बचाव करण्यासाठी लक्ष्मण पाटील यांनी विहीरीत उडी मारली. पण पत्नी मालती यांचे ओरडने ऐकून त्यांच्या मदतीसाठी श्री. पाटील गेल्यावर ते ही या घटनेत जखणी झाले. शेजारच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी धुर केल्यावर या मधमाशा निघून गेल्या. आजरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक फर्नांडीस यांनी त्यांच्यावर उपचार केले. 

Web Title: four injured in honeybee attack in Ajra Taluka

टॅग्स