चार लाख ग्राहकांची वीज पश्‍चिम महाराष्ट्रात खंडित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे अद्यापही ११ हजार ६१ ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) पाण्याखाली आहेत. त्यामुळे तीन लाख ९८ हजार ७३७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित ठेवला आहे. नागरिकांचे स्थलांतर केलेल्या ठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

पुणे -पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे अद्यापही ११ हजार ६१ ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) पाण्याखाली आहेत. त्यामुळे तीन लाख ९८ हजार ७३७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित ठेवला आहे. नागरिकांचे स्थलांतर केलेल्या ठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

पूर्वी बंद असलेल्यापैकी ५ हजार ८८० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित केलेला असून पूरस्थिती कमी होताच तो सुरू करणार असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले. कोल्हापूरात एक लाख १० हजार, तर सांगली जिल्ह्यातील ९९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. याची माहिती संबंधितांना एसएमएसद्वारे दिली आहे. कोल्हापूरसाठी ७८७५७६९१०३, तर सांगलीसाठी ७८७५७६९४४९ हे हेल्पलाइन क्रमांक महावितरणने उपलब्ध करून दिले आहेत.  पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील बंद ठेवलेला वीजपुरवठा सुरळीत केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakh consumers electricity disconnected in western Maharashtra